Eye Flu Symptoms: आय फ्लूमुळे येऊ शकते अंधत्व; ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

Information on Eye Flu: आय फ्लूचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसल्यावर लगेच उपचार करा.
Eye Flu
Eye FluSaam Tv
Published On

About Eye Flu:

सध्या संपूर्ण देशात पावसाचे वातावरण आहे. पावसामुळे साथीच्या रोगांनी नागरिकांना घेरलं आहे. पावसामुळे आजार पसरताना दिसत आहे. त्यातच आय फ्लूचे प्रमाण खूप जास्त वाढताना दिसत आहे. आय फ्लूचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसल्यावर लगेच उपचार करा.

जर कुटुंबातील एका व्यक्तीला हा संसर्ग होत असेल तर सर्व सदस्यांना याची लागण होते. लहान मुले, तरुण आणि वृद्ध सर्वांनाच या संसर्गाने ग्रासले आहे. हा आजार देशानंतर आता राज्यातही पसरण्यास सुरवात झाली आहे.

Eye Flu
Tobacco Side Effects : तंबाखू खाणाऱ्यांनो सावधान! तोंडाचाच नाही तर डोक्याचा आणि मानेचाही कर्करोग होऊ शकतो, जाणून घ्या कारणे

पावसाळ्यात तापमान कमी होऊन आर्द्रता वाढते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे डोळ्याच्या फ्लूसारखे आजार होतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, डोळ्यांचा फ्लू काही दिवसात बरा होतो. परंतु लक्षणे दीर्घकाळ दिसल्यास आणि उपचार न केल्यास डोळ्यांना देखील नुकसान होऊ शकते.

रोज १०० हून अधिक रुग्ण वाढतायत

आय फ्लुचा संसर्ग रोज वाढताना दिसत आहे. कुटुंबातील एकाला आय फ्लू झाला की त्याचा संसर्ग कुटुंबातील इतर व्यक्तींनाही होतो. आय फ्लूचे रोज १०० हून अधिक रुग्ण वाढताना दिसत आहे. हा संसर्ग काही आठवड्यात बरा होतो. परंतु जर त्यात बॅक्टेरियाचा संसर्ग असेल तर लक्षणे गंभीर असू शकतात. अशा परिस्थितीत, लोकांना वेदना किंवा डोळे लालसर झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो.

Eye Flu
ITR Alternatives: आयटीआर भरण्यात अडचण येतेय? तुमच्यासाठी 'हे' 5 पर्याय ठरतील फायदेशीर

निष्काळजीपणा करु नका

दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील नेत्र विभागाचे एचओडी प्रोफेसर डॉ. ए.के. ग्रोवर यांनी सांगितले की, डोळ्यांच्या फ्लूच्या बाबतीत स्वत: चे घरगुती औषधोपचार टाळले पाहिजे. या परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डोळ्यांतील वेदना आणि लालसरपणा वाढत असेल तर हे आजार गंभीर स्वरूप धारण करत असल्याची लक्षण आहेत. या स्थितीत रुग्णालयात जावे.

ज्या लोकांना आधीच डोळ्यांचा कोणताही आजार आहे त्यांनी अधिक सावध राहायला हवे. या लोकांनी डोळ्यांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करु नये. यामुळे डोळ्याचा प्रकाश कमी होण्याचा धोका असतो. काही लोक घरगुती उपचारांमध्ये करतात. परंतु डोळ्याच्या फ्लूच्या बाबतीत असे करणे टाळले पाहिजे. अशा समस्येमध्ये डोळ्याच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Eye Flu
Income Tax Return : टॅक्स भरण्यासाठी काहीच दिवस शिल्लक! ITR-1 चा फॉर्म भरण्याचा अधिकार कुणाला? जाणून घ्या सविस्तर

आय फ्लु वाढण्याची कारणे

एपिडेमियोलॉजिस्ट डॉ जुगल किशोर यांच्या म्हणण्यानुसार,सध्या डोळ्यांच्या फ्लूच्या रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात वाढ होत आहे. पूर्वीच्या तुलनेत जवळपास तिप्पट प्रकरणे समोर येत आहेत. त्याची कारणे जाणून घेणे आवश्यक आहे. यासोबतच लोकांना या संसर्गाची माहिती लोकांना द्यावी लागेल. याचे कारण असे की, डोळ्यांच्या फ्लूची लक्षणे आणि उपचारांची लोकांना माहिती असायला हवी.

ही आहेत आय फ्लूची लक्षणे

  • अधिक प्रमाणात डोळे दुखणे

  • डोळ्यातून सतत पाणी येणे

  • डोळे लाल होणे

  • डोळ्याला खूप खाज येणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com