Tobacco Side Effects : तंबाखू खाणाऱ्यांनो सावधान! तोंडाचाच नाही तर डोक्याचा आणि मानेचाही कर्करोग होऊ शकतो, जाणून घ्या कारणे

Tobacco's Disadvantages: तंबाखूच्या सेवनाने फक्त तोंडाचा कॅन्सर होतो असा सर्वसाधारण समज आहे, पण तंबाखूमुळे डोके आणि मानेचा कॅन्सरही होतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Tobacco Side Effects
Tobacco Side EffectsSaam Tv
Published On

Health Issue Due To Tobacco:

कर्करोगाचा आजार हा सर्वात धोकादायक मानला जातो. या आजाराच्या बळी पडण्याची संख्या देखील जास्त प्रमाणात आहे. हा संसर्गजन्य आजार नसला तरी साथीच्या रोगाने पसरणासा आहे.

मागच्या काही काळापासून तोंडाचा कर्करोग हा सातत्त्याने वाढ होताना दिसत आहे. तंबाखूच्या सेवनाने फक्त तोंडाचा कॅन्सर होतो असा सर्वसाधारण समज आहे, पण तंबाखूमुळे डोके आणि मानेचा कॅन्सरही होतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Tobacco Side Effects
Chest Enlargement In Males : पुरुषांमधील वाढलेल्या छातीचा आकार ठरतोय नैराश्यास कारणीभूत

देशातील एकूण कर्करोगाच्या (Cancer) 20 टक्के रुग्ण हे डोके आणि मानेच्या कर्करोगाचे आहेत. या दोन्ही कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 40 टक्के रुग्ण तंबाखूचे सेवन करणारे आणि धूम्रपान (Smoking) करणारे आहेत. या दोन कॅन्सरचे निदान हे खूप उशीराने होते. अनेक प्रकरणांमध्ये, लोक त्यांच्या आजाराकडे (Disease) दुर्लक्ष करतात. प्राथमिक स्तरावर तपासणीसाठी चांगल्या सुविधा नसल्यामुळेही कर्करोग उशिरा आढळून येतो.

1. डोके आणि मान कर्करोगाचा धोका वाढतो

बंगळुरू येथील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक, एचसीजी कॅन्सर सेंटरचे डॉ. विशाल राव म्हणतात की, तंबाखूमध्ये नायट्रोसामाइन्स आणि पॉलीसायक्लिक हायड्रोकार्बन्स घटक असतात ज्यामुळे कर्करोग वाढण्यास मदत होते. तंबाखू हा तोंडाच्या आरोग्याव्यतिरिक्त अल्कोहोलच्या अतिसेवनाने देखील होतो. अशा परिस्थितीत तंबाखूच्या सेवनाचा विचार करण्याची गरज आहे.

Tobacco Side Effects
Maharashtra Tour Package: IRCTC चं नवं टूर पॅकेज! कमी खर्चात अनुभवा निसर्गरम्य महाराष्ट्र; कशी कराल बुकिंग?

2. काळजी कशी घ्याल?

डोके आणि मानेच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी तंबाखू आणि दारूचे सेवन कमी करावे लागेल. तसेच वयाच्या ३० वर्षांनंतर कर्करोगाची नियमित तपासणी करावी. जर तुम्हाला कॅन्सरशी संबंधित काही लक्षणे दिसत असतील तर त्याची तपासणी करा. वेळेवर चाचणी करून घेतल्यास, सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोग सहज शोधता येतो. त्यामुळे भविष्यात गंभीर धोका टळू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com