WhatsApp Accounts Ban Yandex
लाईफस्टाईल

WhatsApp ने बंद केले तब्बल ६९ लाख अकाउंट्स; काय आहे कारण? जाणून घ्या

WhatsApp Accounts Ban : जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. व्हॉट्सअ‍ॅपने तब्बल ६९ लाख अकाउंट्स बंद केली आहेत. डिसेंबर महिन्यात कंपनीने हे अकाउंट्स बंद केली आहेत. कंपनी ही कारवाई का केली याची माहिती घेऊया.

Bharat Jadhav

Meta Company Ban WhatsApp Accounts :

जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या सोशल मीडिया साईटवरुन ऑनलाइन स्कॅमच्या आणि फ्रॉडच्या घटना घडत आहे. या घटनांवर पायबंद घालण्यासाठी मेटा कंपनीने मोठी कारवाई केलीय. व्हॉट्स अ‍ॅपच्या मेटा कंपनीने तब्बल ६९ लाख अकाउंट्स बंद केली आहेत. कंपनीने हे याविषयीची माहिती दिलीय. मेटा कंपनीने ही कारवाई का केली याची माहिती जाणून घेऊ..(Latest News)

ऑनलाइन फ्रॉड आणि स्कॅमच्या घटना थांबवण्यासाठी मेटा कंपनीने अशा संशयित व्हॉट्स अ‍ॅप अकाउंट्सवर नजर ठेवून आहे. जे वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपच्या नियमांचे पालन करत नाहीत,अशा अकाउंट्सवर कारवाई केली जात आहे. यासंदर्भात माहिती देताना कंपनीने सांगितले की, जे ग्राहक माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे नवीन नियम पाळत नाहीत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या नियमांचे उल्लंघन करत आहेत, अशा ६९ लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सला बंद करण्यात आले आहे. ही खाती बंद करण्याची कारवाई डिसेंबर २०२३ च्या महिन्यात केली होती.जे ग्राहक प्रायव्हेसी पॉलिसी पाळत नाहीत, त्यांची खाती बंद करण्यात आली आहेत. यानुसार मेटा कंपनीने तब्बल ६९,३४,००० अकाउंट्स बंद केली आहेत. कंपनीने महिन्याच्या कम्पाइलेंस रिपोर्टमध्ये सांगितलं की, याआधी १६ लाख ५८ हजार अकाउंट्स रद्द करण्यात आली होती.

गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅप फ्रॉड आणि स्कॅमच्या घटनांमध्ये वाढ झालीय. याला पायबंद घालण्यासाठी कंपनी व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सवर नजर ठेवत आहे. डिसेंबर महिन्यात ७१ लाख खाती रद्द केली होती. तर डिसेंबर महिन्यात सर्वाधिक १६,३६६ रिपोर्ट मिळल्याचं कंपनीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT