How to Prevent Eyeglasses in Children saam tv
लाईफस्टाईल

Child Eye Health: मुलांना चष्मा लागू नये वाटत असेल तर काय करावं? पालकांसाठी नेत्ररोग तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Eye Care Tips: मुलांचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी नेत्रतज्ज्ञ पूजा कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या. योग्य आहार, व्यायाम आणि स्क्रीन टाइम कमी केल्याने डोळ्यांना मिळते संरक्षण.

Sakshi Sunil Jadhav

लहान वयातच डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मोबाईल आणि टीव्हीचा वापर मर्यादित ठेवा.

पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप डोळ्यांचे आरोग्य राखते.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि ऑनलाइन क्लासेसमुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांचे आजार झपाट्याने वाढले आहेत. लहान वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकांना सर्वात मोठी चिंता म्हणजे मुलांना चष्मा लागू नये यासाठी काय करावं? याची संपूर्ण माहिती नेत्ररोग तज्ज्ञ पूजा कुलकर्णी यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

डोळ्याची तपासणी कोणत्या वयात केली पाहिजे?

नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते, लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत डोळ्यांची चाणचणी करता येते. बाळ जन्माला आल्यानंतर २१ दिवसाच्या आत डॉक्टर तुम्हाला बाळाच्या सर्व चाचण्या करण्याचा सल्ला देतात. काही बाळं जी वेळेच्या आधी जन्माला येतात त्यांच्या डोळ्यांच्या पडद्याचे स्पेशल चेकअप करावे लागते. तसेच मुल ३ वर्षाचे झाले की पुन्हा एकदा चेकअप करणे गरजेचे असते. कारण या वयात मुलांना मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर करायला लागतात.

लहान मुलांना चष्म्याचा प्लस नंबर कसा येतो?

तज्ज्ञांच्या मते, काही गोष्टींवर कधीकधी फोकस करायला त्रास होतो. त्यामुळे त्यांना प्लस नंबर येऊ शकतो. यामध्ये बाळांचे चेकअप करताना त्यांच्या डोळ्यात प्रथम ड्रॉप घालते जाते. त्याने त्यांच्या डोळ्यांची बाहूली मोठी होते आणि मग चेकअप केले जाते. यातच मुलांचा स्क्रीन टाईम वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते मुलांना २ वर्षे पूर्ण होईपर्यंत मोबाईल स्क्रीन दाखवणं टाळलंच पाहिजे. मग ३ ते ४ या वयोगटात १ तास तुम्ही स्क्रीन दाखवू शकता. त्यामध्ये डिस्टन्स ठेवून आणि अभ्यासाठीच स्क्रीन दाखवा.

तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार, योग्य झोप, स्क्रीन टाइमवर नियंत्रण आणि डोळ्यांचे नियमित व्यायाम हे काही सोपे उपाय मुलांचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

मुलांचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी खास टीप्स:

1. मोबाईल आणि स्क्रीन टाइम कमी करा

मुलांना सतत मोबाईल किंवा टीव्ही पाहू देऊ नका. दिवसात जास्तीत जास्त १ ते १.५ तासांपर्यंत स्क्रीन वापर मर्यादित ठेवा.

2. डोळ्यांना विश्रांती द्या

प्रत्येक २० मिनिटांनी मुलांना स्क्रीनपासून दूर बघायला सांगा. खिडकीबाहेरची हिरवळ, झाडे किंवा निसर्ग दाखवा.

3. पौष्टिक आहार द्या

गाजर, पालक, बीटरूट, पपई, आंबा, बदाम आणि मासे हे व्हिटॅमिन A आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड्सने समृद्ध अन्न डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

4. डोळ्यांचे व्यायाम शिकवा

दररोज सकाळी काही मिनिटे डोळ्यांचे व्यायाम करायची सवय लावा. जसे की गोल फिरवणे, वर-खाली बघणे केल्याने डोळ्यांची स्नायूशक्ती वाढते.

5. पुरेशी झोप आवश्यक

मुलांना रोज किमान ८ ते १० तासांची झोप मिळणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.

6. सूर्यप्रकाशात खेळू द्या

नैसर्गिक प्रकाशात खेळल्याने डोळ्यांची कार्यक्षमता सुधारते आणि दुरच्या गोष्टी स्पष्ट दिसतात.

वरील गोष्टी जर फॉलो केल्या नाहीत तर भविष्यात अनेकांना डोळ्यांच्या कॅन्सरला सामोरे जावे लागू शकते. त्यामध्ये डोळ्यांमध्ये गाठ येणे, सुज येणे, पांढरट दिसणे अशी लक्षणे यात दिसतात. हा कॅन्सर रेटीनामध्ये होतो. याचा आजार हा अनुवांशिकतेने होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

मुलांची डोळ्यांची तपासणी कोणत्या वयात करावी?

नेत्रतज्ज्ञांच्या मते, जन्मानंतर २१ दिवसांच्या आत आणि नंतर ३ वर्षांच्या वयात डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.

मुलांना चष्मा लागू नये यासाठी काय करावे?

योग्य आहार, पुरेशी झोप, स्क्रीन टाइमवर नियंत्रण आणि डोळ्यांचे व्यायाम केल्यास डोळे निरोगी राहतात.

मुलांचा स्क्रीन टाइम किती असावा?

२ वर्षांखालील मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवावे आणि ३-४ वर्षांच्या मुलांना दिवसात जास्तीत जास्त १ तास स्क्रीन दाखवावी.

डोळ्यांसाठी कोणते अन्न उपयुक्त आहे?

गाजर, पालक, पपई, आंबा, बदाम आणि मासे यांसारखे व्हिटॅमिन A आणि ओमेगा-३ असलेले अन्न डोळ्यांसाठी उपयुक्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहशतवादी पथकाची मोठी कारवाई; मुंब्र्यानंतर कुर्ल्यात छापेमारी, नेमकं काय सापडलं? VIDEO

Maharashtra Live News Update: दिल्ली स्फोटातील जखमींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

Delhi Blast Video: दिल्ली स्फोटाचा पहिला VIDEO; लाल किल्ल्याजवळ सिग्नलवर कार आली अन् क्षणांत होत्याचं नव्हतं झालं

Khaman Dhokla: घरच्या घरी बनवा सुरत स्टाईल मऊ , लुसलुशीत खमण ढोकळा

राजकीय समीकरणं बदलली, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? VIDEO

SCROLL FOR NEXT