Urine Infection Saam Tv
लाईफस्टाईल

Urine Infection : युरिन इन्फेक्शन झाल्यावर काय कराल ?

युरिन इन्फेक्शन होण्याची अनेक कारणे आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urine Infection : युरिन इन्फेक्शन होण्याची अनेक कारणे आहेत. ही समस्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये समान प्रमाणात आढळते. काही वेळा अस्वच्छतेच्या अभावामुळे युरिन इन्फेक्शनही होऊ शकते. उदाहरणार्थ, लघवी जास्त वेळ रोखून ठेवणे, मासिक पाळी दरम्यान साफसफाईकडे दुर्लक्ष करणे यामुळे ही समस्या उद्भवू शकते. मात्र, तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही युरिन इन्फेक्शन टाळू शकता.

आयुर्वेदानुसार (Ayurved) आवळा आणि मधाचे सेवन करून तुम्ही युरिन इन्फेक्शन टाळू शकता. आवळ्याच्या रसात मध मिसळून दिवसातून तीन वेळा प्या. ते प्यायल्याने लघवीमुळे (Urine) होणारी जळजळ शांत होते.

आयुर्वेदानुसार वेलचीच्या सेवनाने या समस्येत आराम मिळतो. वेलची पावडर दुधात उकळा. चांगली उकळी आल्यावर कोमट झाल्यावर सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास त्यात साखर मिसळूनही पिऊ शकता.

एका अभ्यासानुसार, क्रॅनबेरीचा रस युरिन इन्फेक्शनचा धोका कमी करण्यास मदत करतो. संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.

लसणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल मुबलक प्रमाणात आढळतो, जे तुम्हाला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते. जेवणात लसणाचे नियमित सेवन करा.

युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता. तुम्हाला हवे असल्यास नारळाच्या पाण्यात गूळ आणि धने पावडर मिसळून पिऊ शकता. हे युरिन इन्फेक्शनला प्रतिबंध करते.

पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. अशा परिस्थितीत तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितकी जास्त घाण तुमच्या शरीरातून बाहेर पडेल. लघवी करताना त्रास होत असेल किंवा लघवी करताना जळजळ होत असेल तर भरपूर पाणी प्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT