Blood Pressure saam tv
लाईफस्टाईल

Blood Pressure : वयाच्या साठीनंतर रक्तदाब किती असायला हवा? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं सत्य

Senior Citizen Health : वयाच्या साठीत तुमच्या ब्लड प्रेशरचे प्रमाण योग्य असले पाहिजे. जर यामध्ये वाढ होत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या बदलत्या लाइफस्टाइलचा ह्रदयावर जास्त परिणाम होताना पाहायला मिळतोय. आता लोक उशीरा उठणं, वेळेवर न जेवणं, बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणं, व्यायाम टाळणं, मोबाइल जास्त स्कोल करणं अशा सवयी फॉलो करायला लागलेत. त्याच्या परिणाम तुम्हाला साठीत जाणवू शकतो.

बऱ्याचदा ६० वर्ष ओलांडल्यानंतर बीपी १४०/९० असेल तर काळजी करण्याची गरज नाही, असा समज असतो. पण हा समज चुकीचा ठरू शकतो. कारण ६० वर्षांच्या व्यक्तीचा रक्तदाब १४०/९० असणं नॉर्मल मानलं जात नाही. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? डॉक्टरांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

६० व्या वर्षी BP १४०/९० असणं नॉर्मल आहे का?

कार्डियाक सायन्सेसचे तज्ज्ञ डॉ. असीम धल्ल यांच्या मते, १४०/९० mmHg इतके ब्लड प्रेशर प्रौढ व्यक्तींसाठी नॉर्मल किंवा योग्य मानला जात नाही. वय ६० वर्षे असलं तरी हा रक्तदाब उच्च रक्तदाबाच्या श्रेणीमध्येच येतो. पण फक्त एकदा बीपी १४०/९० असेल तर उच्च रक्तदाब असल्याचं निश्चित होत नाही. दिवसभरात स्ट्रेस, टेन्शन, व्यायाम, चहा-कॉफी किंवा धूम्रपानामुळे ब्लड प्रेशरमध्ये तात्पुरता बदल होऊ शकतो.

सतत BP १४०/९० येत असेल तर काय कराल?

जर घरच्या घरी सतत बीपी १४०/९० येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही दिवस रोज बीपी तपासून त्याची नोंद ठेवा आणि डॉक्टरांना दाखवा. या रीडिंगनुसार डॉक्टर पुढील उपचार ठरवू शकतात. तुम्ही आधीपासून बीपीची औषधे घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा डोस कमी किंवा बंद करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा डाव? पोलिसांचंच कृत्य CCTV मध्ये कैद; राजकरणात खळबळ

Gut Health: पोट हलके आणि एनर्जेटिक ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात या 8 सवयी सामील करा

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती; संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा

Nagpur : नागपूर जिल्ह्यात खळबळ! रस्त्यालगतच्या पुलाखाली 102 काडतुसे, पोलिसांकडून कसून तपास सुरू

Heart Attack : तूप की तेल, हृदयासाठी सुपरहेल्दी काय? हार्ट अटॅकचा टळेल धोका

SCROLL FOR NEXT