डोळ्यांच्या आसपास त्वचेवर लहान पिवळे ठिपके दिसतात. अनेकांना हे चिंतेचं कारण असू शकतं. मेडिकल भाषेत याला झँथेलास्मा (Xanthelasma) म्हणतात. हे ठिपके सामान्यतः पापण्यांच्या भोवती तयार होतात आणि पिवळे किंवा फिकट केशरी रंगाचे दिसतात. सामन्यामध्ये यामध्ये कोणत्याही वेदना होत नाहीत.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, बऱ्याच प्रकरणांमध्ये ते हाय कोलेस्ट्रॉल किंवा इतर चयापचय समस्यांचं लक्षण असू शकतात. ग्वाल्हेरमध्ये रतन ज्योती नेत्रालयाचे संस्थापक आणि संचालक नेत्ररोगतज्ञ डॉ. पुरेंद्र भासिन यांनी असे डोळ्यांभोवती टिपके दिसल्यावर काय करावं याची माहिती दिलीये.
डॉ. पुरेंद्र भासिन यांच्या मते, जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांभोवती पिवळे डाग दिसले तर पहिल्यांदा नेत्रतज्ञ किंवा त्वचारोग तज्ञाचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. मूळ कारण शोधण्यासाठी डॉक्टर सहसा लिपिड प्रोफाइल, ब्लड शुगर आणि इतर आवश्यक चाचण्या करण्याची शिफारस करतात. केवळ डाग काढून टाकणे पुरेसे नाही त्यामागील मूळ कारण समजून घेणं आणि त्यावर उपचार करणं देखील महत्त्वाचं आहे.
डॉ. पुरेंद्र भासिन यांनी स्पष्ट केलं की, डोळ्यांभोवतीचे हे पिवळे डाग नाहीसे करण्यासाठी अनेक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत, ज्यामध्ये लेजर थेरपी, क्रायोथेरपी, केमिकल पील्स किंवा शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकणं यांसारख्या प्रक्रियांचा समावेश आहे. दरम्यान उपचारानंतरही कोलेस्ट्रॉल किंवा इतर धोक्याचे घटक नियंत्रणात न ठेवल्यास ते पुन्हा उद्भवण्याचा धोका असतो.
डॉ. पुरेंद्र भासिन म्हणतात की, डोळ्यांभोवतीच्या पिवळ्या डागांची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी जीवनशैलीतील बदल देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. सॅचुरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणं, हिरव्या भाज्या, फळं, संपूर्ण धान्य आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणं, नियमित शारीरिक व्यायाम करणं आणि वजन नियंत्रणात ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. जर तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असेल, तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार देखील आवश्यक असू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.