Surabhi Jayashree Jagdish
कार्डियाक अरेस्ट येण्यापूर्वी पायांमध्ये काही प्रमाणात लक्षणं दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणं वेळेत ओळखून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
कार्डियाक अरेस्टपूर्वी काही लोकांच्या पायांमध्ये किंवा घोट्यांमध्ये अचानक सूज दिसून येऊ शकते. हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करू शकत नसल्यामुळे शरीरात द्रव साचू लागतो आणि त्याचा परिणाम पायांवर दिसतो.
रक्ताभिसरण कमी झाल्यास पायांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि पाय सतत थंड राहू लागतात. काही लोकांना पाय बधिर झाल्यासारखे किंवा सुन्न झाल्यासारखे वाटते.
हृदय नीट कार्य करत नसल्यास स्नायूंना ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळतो आणि त्यामुळे पायांमध्ये वेदना वाढू शकतात. चालताना किंवा झोपेत अचानक गोळे येणे हे देखील धोक्याचे संकेत असू शकतात.
रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे पायांचा रंग फिकट, निळसर किंवा जांभळट दिसू शकतो. काही वेळा त्वचेवर डाग किंवा असामान्य बदलही दिसून येतात. हे शरीरात ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नसल्याचं लक्षण असू शकतं.
कार्डियाक अरेस्टपूर्वी शरीराला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे थोडं चालल्यानंतरही पाय थकतात. जिने चढताना किंवा साधं चालतानाही पायांमध्ये कमजोरी जाणवू शकते. हा थकवा सतत वाढत असेल तर तो हृदयाच्या समस्येशी संबंधित असू शकतो.
कार्डियाक अरेस्टपूर्वी छातीत दडपण, धडधड वाढणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं दिसू शकतात. काही लोकांना अचानक चक्कर येणं, घाम येणं किंवा अस्वस्थता वाढल्यासारखं वाटतं.