Surabhi Jayashree Jagdish
जास्त तळलेले आणि फास्ट फूड खाल्ल्यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं. हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचून अडथळा निर्माण करतं. त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते आणि ते थकू लागतं.
रक्तदाब सतत जास्त राहिल्यास हृदयावर अतिरिक्त दाब येतो. या दाबामुळे हृदयाच्या स्नायूंना सतत जास्त काम करावं लागतं. दीर्घकाळ असा ताण राहिल्यास हृदय कमजोर होऊ शकतं.
शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही. शरीरात चरबी वाढते आणि हृदयावर दबाव येतो. त्यामुळे हृदय हळूहळू कमजोर आणि थकलेलं होतं. हृदय थकल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात ते पाहूयात.
हृदय नीट रक्त पंप करू न शकल्यास शरीरात पाणी साचू लागतं. यामुळे विशेषतः पायांमध्ये सूज दिसून येते. ही सूज दिवसभर उभं राहिल्यावर अधिक वाढते.
रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे पायांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे पाय सतत जड आणि थकलेले वाटतात. थोडं चालल्यानंतरही खूप थकवा जाणवतो.
रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे पायांपर्यंत उष्णता नीट पोहोचत नाही. त्यामुळे पाय थंड पडणं किंवा मुंग्या येणं अशी लक्षणं दिसतात. हे हृदयाच्या कमजोरीचं महत्त्वाचं संकेत मानलं जातं.
तुमचं हृदय थकण्यामागे अनेक कारणं आहेत. यामध्ये तुमचा आहार आणि जीवनशैली हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.