Cholesterol Normal Range saam tv
लाईफस्टाईल

Cholesterol Normal Range: नॉर्मल कोलेस्ट्रॉलची लेवल किती असली पाहिजे? हार्ट अटॅकचा धोका कोणत्या पातळीत मानला जातो?

Normal Cholesterol Level Heart Attack Risk : कोलेस्ट्रॉल हा आपल्या रक्तात आढळणारा मेणासारखा पदार्थ असून तो सामान्य प्रमाणापेक्षा जास्त असल्यास, रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. यासाठी आपल्या सर्वांना कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी माहिती असणं फार गरजेचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या हार्ट अटॅकची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. हार्ट अटॅक येण्यामागे शरीरात वाढलेलं वाईट कोलेस्ट्रॉल कारणीभूत मानलं जातं. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य खाण्याच्या सवयींमुळे ही समस्या गंभीर मानली जातेय. कोलेस्ट्रॉल हा आपल्या रक्तात आढळणारा मेणासारखा पदार्थ असून तो सामान्य प्रमाणापेक्षा जास्त असल्यास, रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो.

कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदय आणि मेंदूला रक्तपुरवठा विस्कळीत होऊ लागतो. जर कोलेस्ट्रॉलची पातळी मर्यादेपेक्षा जास्त वाढली तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतो. अशा परिस्थितीत त्याबद्दल निष्काळजी राहणं घातक ठरू शकते. यासाठी आपल्या सर्वांना कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी माहिती असणं फार गरजेचं आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होणं हे घातक मानलं जातं. चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य राहिली पाहिजे. चांगल्या कोलेस्ट्रॉलला हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) म्हणतात तर वाईट कोलेस्ट्रॉलला लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणतात.

कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी किती असली पाहिजे?

  • जर वाईट कोलेस्ट्रॉल १०० मिलीग्राम/डेसीएल पेक्षा कमी असेल तर ते सामान्य आहे.

  • जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल 130 mg/dL किंवा त्याहून अधिक असेल तर ती बॉर्डर लाईन मानली जाते.

  • जर कोलेस्ट्रॉल १६० mg/dL पेक्षा जास्त असेल तर ते धोकादायक ठरू शकते.

  • याशिवाय रक्तातील चांगलं कोलेस्ट्रॉल 60 mg/dL किंवा त्याहून अधिक असतं तेव्हा ते सामान्य मानण्यात येतं.

  • जर हे प्रमाण ४० मिलीग्राम/डेसीएल किंवा त्यापेक्षा कमी झालं तर ते खूप कमी मानण्यात येतं.

  • जेव्हा शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल १९० मिलीग्राम/डीएल पेक्षा जास्त होतं त्यावेळी ती एक धोकादायक स्थिती मानण्यात येते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका सर्वाधिक असतो. जर कोलेस्ट्रॉल ३०० किंवा त्याहून अधिक पोहोचले तर ती एक चिंताजनक परिस्थिती मानण्यात येते. अशा परिस्थितीत लोकांनी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार घ्यावेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT