Cholesterol Levels - What You Need to Know saam tv
लाईफस्टाईल

World Heart Day: हार्ट अटॅक टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी? तज्ज्ञांनी दिली अचूक माहिती

Surabhi kocharekar

सध्याच्या काळात चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागले आहेत. यामध्ये हृदयाच्या समस्या आणि हार्ट अटॅक यांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. केवळ वयस्कर व्यक्ती नाही तर तरूण मुलांमध्ये देखील याचं प्रमाण वाढलं आहे. हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असेल तर तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर लक्ष देणं फार गरजेचं आहे.

कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकमधील संबंध

हृदयविकार हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण मानलं जातं. LDL ला बऱ्याचदा "खराब" कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं. ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस नावाची स्थिती निर्माण होते. हा थर जमा झाल्याने धमन्या अरुंद होऊ शकतात आणि त्यातून रक्तप्रवाह होणं कठीण असतं. परिणामी हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.

माहिमच्या फोर्टिस असोसिएट एस. एल. रहेजा हॉस्पिटलमधील कंसल्‍टंट इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. कयान सियोदिया म्हणाले, तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, कोलेस्ट्रॉलची पातळी हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका दर्शवते. एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) याला खराब कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) हे एक चांगले कोलेस्ट्रॉल आहे जे हृदयाला धोका नसतो.

बहुतेक प्रयोगशाळांमध्ये हे स्टँडर्ड लिपिड प्रोफाइल टेस्‍ट केली जात नाही, परंतु ते तपासलं पाहिजे. Lp(a) पातळी अनुवांशिकरित्या निर्धारित केली जाते आणि हृदयरोगाशी मजबूत संबंध आहे. कोलेस्टेरॉलची पातळी अनुवांशिकता, आहार, जीवनशैली घटक तसंच मधुमेह, हायपोथायरॉईडीझम इत्यादी इतर समस्यांवर अवलंबून असते. ह्रदयाचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरणारे विशिष्ट घटक ओळखणं आणि त्यानंतर त्यावर उपचार करणं महत्त्वाचं आहे, असंही डॉ. कयान यांनी सांगितलं आहे.

वाशीच्या फोर्टिस हीरानंदानी रूग्णालयातील कंसल्टेंट-इंटरवेंशनल कार्डियोलॉजीस्ट डॉ. प्रशांत पवार यांच्या सांगण्यानुसार, कोलेस्ट्रॉलच्या पातळीचा परिणाम हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकते. कोलेस्टेरॉलचे काही मुख्य प्रकार आहेत-

  • लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL): याला 'खराब कोलेस्टेरॉल' असं म्हणतात. कारण यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.

  • उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL): हे 'चांगले कोलेस्ट्रॉल' मानलं जातं. हे हृदयासाठी फायदेशीर आहे.

  • ट्रायग्लिसराइड: रक्तामध्ये आढळणारी चरबी ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याची पातळी 150 mg/dL पेक्षा कमी असावी.

  • लो डेंसिटी लिपोप्रोटीन (VLDL) आणि इंटरमीडिएट-डेंसिटी लिपोप्रोटीन (IDL): हा देखील कोलेस्ट्रॉलचा एक प्रकार आहे. ज्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. जेव्हा कोलेस्ट्रॉल जास्त होतं तेव्हा ते हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लाक तयार करतं. ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. ट्रायग्लिसराइड्सची पातळी नियंत्रित करण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Capital: महाराष्ट्राची राजधानी कोणती? माहितीये का?

Nitin Deshmukh : ठाकरेंच्या आमदार पुत्रावर प्राणघातक हल्ला, सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण

Marathi News Live Updates : पुण्यात काचेच्या कारख्यान्यात माल उतरवताना दोघांचा मृत्यू

Beed News : बीडमध्ये भाजप नेत्याचे बंडखोरीचे संकेत; माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा राडा; सूरजमुळे निक्की आणि अंकिता भिडले..

SCROLL FOR NEXT