Navratri Kanya Pujan Saam tV
लाईफस्टाईल

Navratri Kanya Pujan 2025: कन्या पूजन करताना या चुका टाळाच, अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज

Kanya Pujan in Navratri: नवरात्री २०२५ मध्ये कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. पूजन करताना या चुका टाळा अन्यथा माता लक्ष्मी नाराज होऊ शकतात. योग्य नियम जाणून घ्या.

Manasvi Choudhary

सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेला नवरात्री हा सण साजरा केला जातो. नवरात्री नऊ दिवस दुर्गा देवीच्या रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवस हा देवीसाठी खास असतो. या काळात उपवासाचे व्रत पाळले जातात. महिला व मुलींचा आदर केला जातो. नवरात्रीत कन्यापूजन केले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्यापूजनाला विशेष महत्व आहे. कन्या पूजन केल्यास घरात सुख- समृद्धी प्राप्त होते. दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यानुसार या काळात तुमच्या कडून काही चुका झाल्यास त्याचा परिणाम होईल.

1) नवरात्रीची अष्टमी तिथी ३० सप्टेंबर आणि नवमी तिथी १ ऑक्टोबर रोजी आहे. या दोन्ही तिथीला कन्या पूजन करतात.

2) कन्या पूजन मुलींना काळ्या रंगाची कोणतीच भेटवस्तू देऊ नये.

3) कन्या पूजनाच्या वेळी कन्येचं पोट भरलं असेल तर तिला अन्नासाठी जास्त आग्रह धरू नका त्याच्याशी प्रेमाने बोला.

4) कन्यापूजनच्या वेळी ज्या ठिकाणी तुम्ही पूजन करणार आहात ती जागा स्वच्छ आणि पवित्र असली पाहिजे.

5) कन्या पूजनेनंतर मुलींना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये असे करणे अशुभ मानले जाते यामुळे दुर्गा देवी नाराज होऊ शकते.

6) कन्या पूजनासाठी कन्येला ताजे आणि शुद्ध अन्न द्यावे. शिळे किंवा अर्पण केलेले अन्न घेऊ नये.

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

SCROLL FOR NEXT