DSP Salary in Maharashtra Saam Tv
लाईफस्टाईल

DSP Salary in Maharashtra: पोलिस उपअधीक्षक झाल्यानंतर किती मिळतो पगार, कोणत्या मिळतात सुविधा? जाणून घ्या...

पोलिस उपअधीक्षक झाल्यानंतर किती मिळतो पगार, कोणत्या मिळतात सुविधा? जाणून घ्या...

साम टिव्ही ब्युरो

DSP Salary in Maharashtra: सार्वजनिक सेवा क्षेत्रात डीएसपीचा (DSP) फुलफॉर्म Deputy Superintendent of Police किंवा पोलीस उपअधीक्षक असा आहे. भारतात मोठ्या शहरांमध्ये किंवा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये पोलिस दलाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) करतात आणि लहान जिल्ह्यांमध्ये पोलीस दलाचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक करतात.

पोलीस उपअधीक्षक पद हे भारतातील सर्वात महत्वाचे आणि प्रमुख पदांपैकी एक आहे. हे राज्यस्तरीय पोलीस अधिकारी असतात, जे अत्यंत महत्वाचे आहेत. या अधिकाऱ्यांवर कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारी रोखणे यासारखी आव्हानात्मक कामे सोपवली जातात.

भारतात पोलीस अधिकारी बनणे अत्यंत आव्हानात्मक आहे. कारण पोलीस दलातील प्रत्येक पदासाठी मानसिक आणि शारीरिक शक्ती आवश्यक असते. यातच ज्या व्यक्तींना देशाची आणि लोकांची सेवा करायची आहे, गुन्हेगारी कमी करण्यात मदत करायची आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पेशा आहे. तुम्हीही या पदांवर नोकरी मिळवण्याच्या तयारीत गुंतले असाल तर या गोष्टी काळजीपूर्वक वाचा. (Latest Marathi News)

डीएसपी पगार किती असतो?

पोलीस उपअधीक्षक (DSP) अधिकारी ज्याची नियुक्ती नागरी सेवा परीक्षेच्या आधारे केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये डीएसपींना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. डीएसपीचे वेतन ५३१०० ते १,६७,८०० रुपये असू शकते. सातव्या वेतनश्रेणीच्या नियमानुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये डीएसपीचे वेतन निश्चित केले जाते. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांसाठी इन-हँड पगार ७३९१५ रुपये असू शकतो. (Utility News in Marathi)

पोलीस उपअधीक्षक होण्यासाठी काय असते पात्रता?

पोलीस उपअधीक्षक (DSP) हे पद जबाबदारीचे आहे. यामुळेच कोणाचीही या पदावर निवड करताना काळजी घेतली जाते. खाली दिलेले काही निकष आहेत जे भारतात पोलीस उपअधीक्षक होण्यासाठी पूर्ण करावे लागतात.

  • पोलीस उपअधीक्षक बनण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला पाहिजे, म्हणजेच तो भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

  • या पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांचे वय २१-३० वर्षे (राज्यानुसार बदलू शकते) असावे. एसटी/एससी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात ५ वर्षांची सूट आहे.

  • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT