BP tablets morning or night google
लाईफस्टाईल

BP Medicine: बीपीच्या गोळ्या घेण्याची योग्य वेळ कोणती? न्यूयॉर्कच्या डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या गोळ्या सकाळी घ्याव्यात की रात्री याबाबत गोंधळ असतो. न्यूयॉर्कच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी TIME अभ्यासानुसार स्पष्ट केलेली माहिती जाणून घ्या आणि योग्य औषध वेळ पाळा.

Sakshi Sunil Jadhav

उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन ही आजच्या जगातील सर्वात सामान्य आरोग्याची समस्या मानली जाते. मिलियन हार्ट्सच्या अहवालानुसार अमेरिकेत सुमारे २.५ कोटी प्रौढ लोक बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी काही ना काही औषधं घेतात. त्यामुळे ही औषधं नेमकी कधी घ्यावी याबाबतची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. याबाबत न्यूयॉर्कमधील माउंट सायनाय, स्कार्सडेल येथे कार्यरत असलेले बोर्ड-प्रमाणित हृदयविशेषज्ञ डॉ. इव्हन लेव्हीन यांनी १७ फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर माहिती शेअर केली.

डॉ. लेव्हीन यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून अभ्यासांमध्ये रात्री बीपीच्या गोळ्या घेतल्याने परिणाम चांगले दिसतात असे सुचवले जात होते. मात्र २०२२ मध्ये झालेल्या TIME नावाच्या मोठ्या अभ्यासाने हे मत चुकीचे ठरवले. या अभ्यासानुसार रात्री औषधं घेतल्याने कोणताही विशेष फायदा होत नाही. त्यामुळे बीपीच्या गोळ्या घेण्यासाठी ठराविक वेळ महत्त्वाची नसून, तुम्हाला ज्या वेळेस सहज आठवते आणि पाळणे सोपे वाटते त्या वेळेस घेणे योग्य ठरते.

डॉ. लेव्हीन सांगतात, मी रुग्णांना नेहमी सांगतो की, औषधं जेव्हा तुम्हाला सोयीस्कर आणि लक्षात ठेवायला सोपी वाटतील त्याच वेळेस घ्या. वैयक्तिकरित्या मला सकाळची वेळ सर्वोत्तम वाटते. दात घासायला गेल्यावर सिंकजवळच औषधं ठेवा आणि त्याच वेळी घ्या.

दिवसातून तीन वेळा गोळ्या घेण्याची गरज असणे किंवा अर्ध्या-दीड गोळ्या घेणे यामुळे रुग्णांचा औषधं घेण्यातील शिस्त कमी होते. दिवसातून एकदाच घेण्याची औषधं रुग्ण अधिक चांगल्या प्रकारे घेतात. त्यामुळे ते आपल्या रुग्णांना शक्य असल्यास एकदाच घ्यायची गोळी लिहून देण्याचा प्रयत्न करतात. एकच गोळी पुरेशी असताना दीड गोळी लिहून देणे मला अजिबात योग्य वाटत नाही.

शेवटी, अमेरिकन औषध व्यवस्थेवर टीका करत त्यांनी म्हटले की, एका गोळीत दोन किंवा तीन औषधे एकत्र देणे शक्य असताना अनेकदा रुग्णांना वेगवेगळ्या गोळ्या दिल्या जातात. यामुळे गोंधळ वाढतो.

टीप: ही माहिती केवळ जनजागृतीसाठी असून वैद्यकीय उपचाराचा पर्याय नाही. कोणत्याही आरोग्यसंबंधी प्रश्नांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात खासदार धानोरकर यांच्याकडून काँग्रेस नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन होणार

GST अधिकाऱ्याची आत्महत्या, 7 दिवसानंतर पत्नीचा खळबळ उडवून देणारा दावा

उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

Saturday Horoscope: गुंतवणुकीचा होईल फायदा, 4 राशींना होणार आर्थिक लाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT