Right time to eat rice, Health tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

भात खाण्याची योग्य वेळ कोणती ? रात्रीच्या वेळी भात खायचा की, नाही जाणून घ्या

भाताबद्दल असणाऱ्या समज व गैरसमजाविषयी जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणांना भात खायला आवडतो. इतकेच नाही तर त्यापासून बनवलेले पदार्थ हे चवीने खाल्ले जातात.

हे देखील पहा -

भाताबद्दल अनेकांच्या मनात बरेचसे समज व गैरसमज आहेत. त्यामुळे बरेच जणांना असे वाटते त्याचे सेवन केल्याने आपले वजन वाढेल त्यामुळे तो खाणे टाळतात. त्यात काही लोकांना असे वाटते भाताचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. लहान मुलांना पहिल्या काही महिने भाताचे पदार्थ खाऊ घातले जातात. त्यामुळे त्याचे आरोग्य सुधारते. भात आपल्या शरीरात थंडवा निर्माण करतो त्यामुळे भाताचे सेवन अधिक केले जाते परंतु, त्याची खाण्याची योग्य वेळ कोणती? रात्री तो खायचा की, नाही याविषयी जाणून घेऊया.

- आपल्याला भात (Rice) अधिक प्रमाणात खायला आवडत असेल तर आपण त्याची एक वेळ निश्चित करायला हवी. तसेच त्याचे आपल्या आहारात प्रमाण किती आहे तपासायला हवे. जर आपण आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपण भाताचे सेवन टाळायला हवे. रात्रीच्या वेळी भात खायचा असेल तर आपण आपल्याकडे ब्राउन राईसचा पर्याय आहे. यातून आपल्याला फायबर व प्रथिने अधिक प्रमाणात मिळू शकते.

- भात खाण्यासाठी आपण दुपारची वेळ निश्चित करु शकतो.

- भातात अनेक ऊर्जेचे स्त्रोत आहे त्यामुळे दिवसा त्याचे सेवन केल्यास शरीराला एनर्जी मिळेल.

- भातात असणारे कार्बोहाइड्रेट आपल्या शरीराला ताकद देतात. तसेच दिवसा भाताचे सेवन केल्यास पचायला हलके जाते.

- लघवीशी असणाऱ्या समस्येपासून आपली सुटका होऊ शकते. त्याप्रमाणेच चेहऱ्यासाठी व केसांसाठी देखील त्याचा फायदा होतो.

- रात्रीच्या वेळी (Time) आपल्या अधिक विश्रांतीची गरज असते अशावेळी आपण भाताचे सेवन केल्यास आपल्याला आळस येऊ लागतो व आपण झोपतो. शरीराची कोणतीही क्रिया न झाल्यामुळे आपले वजन वाढू लागते. त्यासाठी रात्रीच्या वेळी भात खाणे शक्यतो टाळावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

SCROLL FOR NEXT