Right Time To Check Weight Saam Tv
लाईफस्टाईल

Right Time To Check Weight : वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, दुपारी की, संध्याकाळी ? जाणून घ्या

Morning or evening weight check Tips : सतत वजन पाहात राहाणे स्वतःवर आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करण्यासारखे आहे नाही का?

कोमल दामुद्रे

Weight Checking Tips : वजन हा आपल्या सर्वांच्या डोक्यात असणारा आणि चार चौघात सहज बोलला जाणारा विषय आहे. इतका की, एखादी व्यक्ती आपले वजन वाढण्याच्या चिंतेने दररोज वजन पाहात राहाते. आपण नेहमी आपल्या वजनाच्या बाबतीत जरा जास्तच विचार करतो. पण अशा प्रकारे सतत वजन पाहात राहाणे स्वतःवर आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करण्यासारखे आहे नाही का?

जर तुम्ही देखील आपल्या वजनाला (Weight) घेऊन जास्त चिंतेत असाल आणि सतत वजन काट्यावर आपले वजन पाहात असाल तर थांबा! तुम्हाला माहिती आहे का? आपले योग्य वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती ? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपण सतत वजन तपासणे अयोग्य असू शकते. वजन कधी व कसे तपासले पाहिजे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

1. वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती?

रोगनिवारण तज्ज्ञ रिया बॅनर्जी अंकोला यांच्या मते वजन तपासण्याची योग्य वेळ (Time) ही सकाळी उपाशी पोटी असते. सकाळी शौच्यानंतर तुमचे आतडे रिकामे असतात आणि काही न खाल्यामुळे शरीरात अतिरिक्त गोष्टींचे वजन नसते त्यामुळे या वेळी वजन तपासल्यास तुम्हाला तुमचे योग्य वजन मिळू शकते.

रिया बॅनर्जींच्या या वक्तव्यास पाठिंबा देत पोषणतज्ज्ञ आणि सोलफिट क्लाउड किचन डेहराडूनच्या संस्थापिका रुपा सोनी यांनी देखील "वजन तपासण्यापूर्वी जर तुमचे पोट रिकामे असेल आणि रात्रीच्या अन्नची विष्ठा देखील स्वच्छ झाली असेल तर तुम्हाला तुमचे योग्य वजन मिळवण्यास मदत होते. असे केल्याने तुमच्या वजनात 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत फरक जाणवेल." असे साांगितले.

हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, सकाळचे वजन हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. जे लोक दिवसातून निदान 45 मिनिटे व्यायाम करतात. त्यांच्यासाठी सहसा रात्री वजन जास्त असू शकते कारण त्यात पाणी (Water) आणि जेवणाचा सामावेश असतो. परंतु, खेळाडू किंवा ज्या व्यक्ती शारीरिक श्रमाची कामे करतात त्यांच्यासाठी संध्याकाळी वजन कमी असू शकते. तरी, सकाळी केलेले वजनच खरे असल्याचे त्यांनी सांगितले.

2. वजन किती वेळा तपासले पाहिजे?

जरी वजन तपासणी करण्याची सकाळ ही एक योग्य वेळ असली तरी तुम्हाला दररोज वजन तपासण्याची आवश्यकता नाही. महिन्यातून एकदा उपाशी पोटी वजन तपासणी करणे हे योग्य ठरेल, पण जर तुम्ही वजन तपासण्यासाठी अगदीच उत्सूक असाल तर आठवड्यातून एकदा वजन तपासणे देखील योग्य ठरेल. पण वजन करण्यापूर्वी तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, तुमच्या वजनावर आदल्या दिवशीच्या आहाराचा, दिवसभरात प्यायलेल्या पाण्याचा, व्यायामाचा आणि दिवसभरात केलेल्या शारीरिक श्रमाचा परिणाम दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

Panvel Election: पनवेल विधानसभेत ८५ हजार दुबार मतदार, खोपोलीनंतर पनवेलमधील घोळ उघड

School Holiday : मुसळधार पावसाचा अलर्ट! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूरमधील शाळांना उद्या सुट्टी

Best Elections : बेस्ट निवडणुक कोण जिंकणार? ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी

Tuesday Horoscope : काहींना शत्रू त्रास देतील, तर काहींची होईल प्रगती; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT