Healthy Eating Habits saam tv
लाईफस्टाईल

Healthy Eating Habits: मुलांना चांगल्या खाण्याच्या सवयी लावण्याचं योग्य वय कोणतं? लहानग्यांच्या आरोग्यासाठी पालकांनी नेमकं काय करावं?

Healthy Habits for Kids: मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी लहान वयातच पौष्टिक आहार, नियमित खेळ, पुरेशी झोप आणि चांगल्या जीवनशैलीच्या सवयी लावणे महत्त्वाचे आहे. पालकांनी स्वतः आदर्श ठेवून मुलांना आरोग्यदायी सवयी आनंदाने शिकवाव्यात आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण तयार करावे.

Surabhi Jayashree Jagdish

मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. लहानपणी मुलं जे शिकतात, त्याचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावरही होतो. त्यामुळे मुलांना लहान वयापासूनच पौष्टिक आहार घेण्याची, रोज खेळण्याची आणि पुरेशी झोप घेण्याची सवय लावणं महत्त्वाचं आहे. याच उद्देशाने अ‍ॅबॉट (Abbott) आणि सेसमी वर्कशॉप इंडियाने मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सुमारे १५० मुलांसाठी विशेष उपक्रम आयोजित केला होता.

यामध्ये एल्मो, ग्रोव्हर आणि कुकी मॉन्स्टर या लोकप्रिय पात्रांच्या पपेट शोच्या माध्यमातून मुलांना आरोग्यदायी सवयींचं महत्त्व मजेशीर पद्धतीने समजावून सांगण्यात आलं. पण मुलांना या सवयी लावायच्या कशा? याबाबत सेसमी वर्कशॉप इंडियाच्या शिक्षण, कंटेंट आणि अभ्यासक्रम विभागाच्या संचालक डॉ. जयंती प्रकाश यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

लहान वयातच चांगल्या सवयी लावणं का गरजेचं?

लहानपणी मुलांच्या अनेक सवयी तयार होत असतात. खाण्यापिण्याच्या वेळा, कोणता आहार खायचा, किती वेळ खेळायचं, किती झोप घ्यायची आणि स्वतःच्या इमोशन्सची काळजी कशी घ्यायची, या गोष्टी मुलं हळूहळू शिकत असतात. त्यामुळे या वयात त्यांना चांगल्या सवयी लावल्यास पुढील आयुष्यातही त्याचा फायदा होऊ शकतो.

डॉ. जयंती प्रकाश यांच्या मते, मुलांना लहान वयातच आरोग्याच्या चांगल्या सवयी शिकवणं महत्त्वाचं आहे. कारण याच काळात त्यांच्या आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या सवयी तयार होऊ लागतात. लहानपणी तयार झालेल्या खाण्यापिण्याच्या, शारीरिक हालचालींच्या आणि झोपेच्या सवयींचा परिणाम पुढे त्यांच्या जीवनशैलीवर आणि आरोग्याशी संबंधित निवडींवर होऊ शकतो.

मुलांना चांगल्या खाण्याच्या सवयी कशा लावाल?

मुलांना केवळ काय खावं हे सांगून उपयोग होत नाही. त्यांना घरात चांगल्या सवयी प्रत्यक्ष पाहायला आणि शिकायला मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असते.

डॉ. जयंती प्रकाश सांगतात की, पालकांनी स्वतः चांगल्या सवयी पाळल्या, घरात त्यासाठी पोषक वातावरण तयार केलं आणि आरोग्यदायी गोष्टी मुलांसाठी आनंददायी बनवल्या, तर मुलांना त्या सहज शिकता येतात.

उदाहरणार्थ, कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून पौष्टिक जेवण करणं, मुलांना विविध प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ खाण्यास प्रोत्साहन देणं, खेळण्यासाठी वेळ देणं, झोपेच्या ठराविक वेळा पाळणं आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं, अशा छोट्या गोष्टींतून मुलांना चांगल्या सवयी लावता येतात.

मुलांवर सतत बंधनं घालण्याऐवजी त्यांना या सवयींचं महत्त्व समजावून सांगणं गरजेचं आहे. आरोग्यदायी सवयी सोप्या असतील आणि रोजच्या जीवनात सहज पाळता येत असतील, तर मुलांना त्या दीर्घकाळ टिकवणंही सोपं जातं.

पौष्टिक आहारासोबत खेळ आणि झोपही महत्त्वाची

मुलांच्या आरोग्याचा विचार करताना फक्त त्यांच्या जेवणाकडे लक्ष देऊन चालत नाही. संतुलित आहार, शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि मानसिक स्वास्थ्य या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मुलांना पौष्टिक जेवण देणं, रोज काही वेळ एक्टिव्ह खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि झोपेचं नियमित वेळापत्रक ठेवणं गरजेचं आहे.

मुलांच्या आरोग्यासाठी पालकांनी काय करावं?

मुलांना प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण बनवण्याचा आग्रह धरण्यापेक्षा चांगल्या सवयी सातत्याने पाळण्यावर भर देणं गरजेचं आहे. एकत्र जेवण करणं, खेळणं, वेळेवर झोपणं आणि कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधणं, या साध्या गोष्टी मुलांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनू शकतात.

पौष्टिक जेवण, खेळ, नियमित झोप आणि कुटुंबासोबतचा चांगला वेळ यांसारख्या छोट्या पण नियमित कृतींचा मुलांच्या दीर्घकालीन आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. योग्य आहार आणि सक्रिय जीवनशैलीमुळे भविष्यात काही दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यासही मदत होऊ शकते.

त्यामुळे पालकांनी मुलांच्या आहाराकडे लक्ष देण्यासोबतच त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात शारीरिक हालचाल, पुरेशी विश्रांती आणि आनंददायी कौटुंबिक वातावरण यांनाही महत्त्व द्यायला हवं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dam Water Level: मान्सून परतला अन् मुंबईकरांची धाकधूक वाढली! ७ तलावातील पाणी पातळी घटली; पाहा ताजी आकडेवारी

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये दिवसाढवळ्या तरसाचा वावर; घरकुल परिसरात नागरिकांमध्ये दहशत

Pomegranate Benefits : १ कप डाळिंबाचे दाणे खाल्ल्यानं शरीराला काय फायदा होतो? जाणून आश्चर्य वाटेल

Political News : १० बंडखोर खासदार कुठे गेले? 'त्या' बैठकीलाही मारली दांडी; ओम बिर्लांच्या नोटीसलाही उत्तर नाही

Congress : काँग्रेसला मोठा धक्का बसणार? माजी मुख्यमंत्री पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत, समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT