Surabhi Jayashree Jagdish
मीठाच्या पाण्यात सोडियमसोबत मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखी आवश्यक खनिजं असतात. ही खनिजे शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाची असतात. त्यामुळे योग्य प्रमाणात मीठाचं पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक खनिजे मिळण्यास मदत होते.
मीठाचं पाणी पोटातील ॲसिड आणि पाचक एंझाईम्सच्या निर्मितीला उत्तेजन देते. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते.
घामाद्वारे शरीरातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई मीठाचं पाणी करते. इलेक्ट्रोलाइट्स स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे पायात किंवा स्नायूंमध्ये येणारे क्रॅम्प्स म्हणजेच गोळे येण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
मीठामध्ये मॅग्नेशियम असते, जे मज्जासंस्था शांत करण्यास मदत करते. त्यामुळे शरीराला आराम मिळण्यास मदत होते. यामुळे तणाव कमी होऊन झोपेची क्वालिटी सुधारण्यास मदत होते.
सध्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीर ॲसिडिक बनू शकते. मीठाचं पाणी शरीराचा pH स्तर संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे शरीर अधिक अल्कलाईन बनण्यास आणि ॲसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होते.
दररोज सकाळी एका ग्लास पाण्यात एक चमचा सैंधव मीठ मिसळून प्यावं. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या ३० मिनिटं आधी पिऊ शकता. सैंधव मीठ म्हणजे काळं मीठ किंवा रॉक सॉल्ट असून ते सामान्य मिठापेक्षा खनिजांनी समृद्ध असलेले नैसर्गिक मीठ आहे. मात्र हे पिण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या
आपलं शरीर न थांबता सतत काम करत असतं आणि त्यासाठी विविध पोषक तत्त्वं आणि खनिजांची गरज असते. घाम, अश्रू आणि लघवीद्वारे शरीरातील पाणी व आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. त्यामुळे साध्या पाण्यासोबत दिवसातून एकदा मीठाचं पाणी घेतल्याने शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढण्यास मदत होते.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.