Dental Care google
लाईफस्टाईल

Brushing Tips: 99% लोकांना ब्रश करण्याची योग्य पद्धत माहित नाही, 'या' चुकीमुळे होतात गंभीर परिणाम, वाचा दात स्वच्छ करण्याची पद्धत...

Teeth Cleaning Techniques : तुम्ही रोज ब्रश करत असाल किंवा रोज महागड्या कोलगेट आणि ब्रशचा वापर करत असाल. मात्र हे सगळं करूनही तुमचे दात पिवळे राहतात असतील.

Saam Tv

तुम्ही रोज ब्रश करत असाल किंवा रोज महागड्या कोलगेट आणि ब्रशचा वापर करत असाल. मात्र हे सगळं करूनही तुमचे दात पिवळे राहतात असतील तर तुमची ब्रश करण्याची पद्धत चुकतेय. या समस्येत दात कसे स्वच्छ करायचे? हे जाणून घ्यायचे असते. तज्ज्ञांच्या मते ४५ टक्के भारतीय २ वेळा ब्रश करत असतात. याचे सगळ्यात जास्त प्रमाण जपानमध्ये आहे.

जपानमध्ये तब्बल ८३ टक्के लोक २ वेळा ब्रश करतात. मात्र ब्रश करण्याची योग्य पद्धतच माहीत नसेल तर तुमचे दात अधिक पिवळे होण्याची शक्यता आहे. तसेच दातांच्या अनेक समस्या सुद्धा उद्भवतात. अशा समस्यांना जर नजर अंदाज केल तर भविष्यात तुम्हाला दात काढून सुद्धा टाकावा लागू शकतो. त्यासाठी ब्रश करण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत जाणून घेऊ.

दात घासण्याची योग्य पद्धत आणि वेळ

जेवणानंतर ३० मिनिटांनी

कार्ब्स किंवा गोड पदार्थ खाल्याने तुमच्या तोंडात बॅक्टेरिया जपा व्हायला सुरुवात होते. तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर तुम्ही साधारण अर्ध्या तासाने ब्रश केला पाहिजे. त्याने तुमचे दात पिवळे होत नाहीत.

पेस्ट न वापरता ब्रश करा

फ्लूराइड टुथपेस्टने दिवसातून दोनदा आणि दोन मिनिटे ब्रश करायला हवा. जर तुमच्याकडे टुथपेस्ट नसेल तर तुम्ही नुसत्या पाण्याने किंवा घरात असलेल्या मीठाने ब्रश करू शकता.

दातांच्या हिरड्यांची स्वच्छता

बऱ्याच वेळेस लोक ब्रश करताना हिरड्यांना स्वच्छ करत नाहीत. त्यात काही लोक हिरड्यांना येवढं घासतात की त्यांची साल निघतात. असं करणं चुकीचं आहे. त्याऐवजी तुम्ही हिरडीपासून ४५ डिगरी लांब ब्रश ठेवून दात घासायला हवे. याने हिरड्यांच्या आजूबाजूला तयार झालेले प्लेक निघून जातो.

दातांच्या आतल्या बाजूची स्वच्छता

दातांच्या आतल्या बाजूची स्वच्छता म्हणजे जिभेची स्वच्छता. तुम्ही रोज दात घासताना जिभ स्वच्छ करणं सुद्धा महत्वाचं आहे. तसेच दातांच्या आतल्या बाजूची स्वच्छता करणं सुद्धा महत्वाचं आहे. नाहीतर आतल्या बाजुने पिवळापणा साचतो आणि तुम्हाला दातांना काढू टाकावं लागू शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT