
हिवाळा फक्त थंड हवाचं नाही तर अशा अनेक समस्या घेऊन येतो की, त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर पडतो. त्यातली एक गंभीर समस्या म्हणजे शरीराला खाज सुटणे. हिवाळ्यात तुम्ही त्वचेची विशेष काळजी घेतली पाहीजे. कारण या दिवसात आपली स्कीन कोरडी पडत असते आणि याच कारणामुळे तुमच्या शरीराला खाज सुटू शकते. अशी अनेक कारणं आणि त्यावर उपाय आपण आज जाणून घेणार आहोत.
थंडीत शरीराला खाज सुटण्याची मुख्य कारणं
हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे, थंड वाऱ्याच्या प्रभाव, अंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर या कारणांमुळे तुमच्या त्वचेला खाज सुटू शकते.
अंगाला येणारी खाज जास्त नसेल तर ही एक नैसर्गिक क्रिया मानली जाते. मात्र याचे प्रमाण वाढल्यास तुमच्या शरीरावर पुरळ किंवा विशिष्ट प्रकारचे डाग येऊ शकतात. याशिवाय तुम्ही रोज अंघोळ करणे आणि रोज नवीन स्वच्छ कपडे वापरत नसाल तर तुमच्या शरीराला खाज येऊ शकते.
हिवाळ्यात शरीराच्या खाजेवर रामबाण उपाय
मॉइश्चरायझरचा वापर
त्वचेला मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा खूप कमी होतो. त्वचा ओली झाल्याने शरीराला खाज येण सुद्धा कमी होतं. तुम्ही यासाठी खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल सुद्धा वापरू शकता.
गरम पाण्याचा वापर
हिवाळा आला की आपण कडक पाणी अंघोळीसाठी वापरतो. मात्र याचा परिणाम तुमच्या त्वचेला भोगावा लागतो. गरम पाण्यामुळे तुमचे शरीर कोरडे होते. तसेच शरीराला जास्त प्रमाणात खाज सुटू शकते.
थंड हवा
थंड हवेत जाणे तुम्ही शक्यतो टाळले पाहिजे. मात्र तुम्हाला जर थंड हवेत कामानिमित्त जावचं लागत असेल तर मफलर, स्वेटर यांचा वापर तुम्ही करणं आवश्यक आहे. याने तुम्ही आजारी पडण्याचा धोका सुद्धा टाळला जावू शकतो.
योग्य आहार
सकस आहार हा योग्य वेळी घेण खूप फायदेशीर मानलं जातं. खाज येण्याबाबतही असेच म्हणता येईल, त्यामुळे आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे.
हायड्रेटेड राहणं
आपण म्हणतो उन्हाळ्यतच जास्त पाणी महत्वाचे आहे. असं मुळात नाही. तुम्हाला हिवाळ्यात तहान लागत नसली तरी तुम्ही पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. अन्यथा तुमचे शरीर जास्त कोरडं होतं आणि शरीराला जास्त प्रमाणात खाज सुटते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Written By : Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.