खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हटलं की, त्यांना एक्सपायरी डेट ही आलीच. आपल्या घरी असे अनेक पदार्थ असतात जे बऱ्याच दिवसांपासून राहिलेले असतात. अनेक वेळा आपण या एक्सपायरी डेटकडे दुर्लक्ष करतो आणि त्या गोष्टी खाऊन टाकतो. मात्र तुम्हाला कल्पना आहे का, या गोष्टी तुमच्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात?
खाद्यपदार्थ खाण्याची एक ठराविक वेळ असते. यालाच आपण एक्सपायरी डेट म्हणतो. यानंतर त्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता म्हणजेच क्लालिटी खराब होऊ लागते.एक्सपायरी डेट संपताच त्यामध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही एक्सपायर झालेले पदार्थ खाल्ले तर तुम्हाला अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
विषबाधा
कालबाह्य अन्नामध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढू शकतात. ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि ताप ही फूड पॉयझिनिंगची लक्षणं आहेत.
तारीख संपलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर पोटात गॅस, ॲसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
एक्सपायरी डेटनंतर पदार्थ खाल्ल्याने काही ऍलर्जीक घटक तयार होतात, ज्यामुळे शरीरात ऍलर्जीची होण्याची शक्यता असते. यावेळी सतत खाज येणं किंवा पुरळ उठणं अशा समस्या दिसून येऊ शकतात.
पदार्थ खरेदी करताना लक्ष द्या
ज्यावेळी तुम्ही खाण्यापिण्याच्या गोष्टी खरेदी करता त्यावेळी त्याची एक्सपायरी डेट तपासून घ्या. शिवाय घेतल्यानंतर लिहून दिलेल्या दिवसांच्या आत पदार्थ संपवा.
साठवणुकीची काळजी घ्या
अन्नपदार्थ योग्य तापमानात आणि योग्य प्रकारे ठेवले पाहिजेत. जेणेकरून ते पदार्थ खराब होणार नाहीत.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.