Difference Between Upi and Upi Lite
Difference Between Upi and Upi Lite Saam TV
लाईफस्टाईल

UPI आणि UPI Lite मध्ये काय आहे फरक? पैशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणता आहे बेस्ट?

Satish Kengar

Difference Between Upi and Upi Lite: भारतात युपीआय पेमेंट सुरू झाल्यापासून त्याचा वापर सातत्याने वाढत आहे. युपीआयच्या मदतीने पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. विशेष बाब म्हणजे UPI च्या मदतीने देशातील कोणत्याही बँक खात्यात पैसे सहज ट्रान्सफर करता येतात

पीआयला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन एनपीसीआयने (NPCI) २०१६ मध्ये UPI Lite लॉन्च केलं होतं. UPI Lite ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या वापरासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. आपण आज UPI आणि UPI Lite मधील फरक जाणून घेणार आहोत.

UPI आणि UPI Lite मध्ये काय आहे फरक?

युपीआयचा वापर एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. तर युपीआय लाईट अंतर्गत UPI Lite वॉलेटमधून प्राप्तकर्त्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. (Latest News)

युपीआयमध्ये तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त २० वेळा पैसे पाठवू शकता. यात तुम्ही जस्तीत जास्त २ लाख रुपये ट्रान्सफर करू शकता. तर UPI Lite सह तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त ४००० रुपये आणि एका वेळी जास्तीत जास्त २०० रुपये ट्रान्सफर करू शकता. (Utility News in Marathi)

युपीआयद्वारे पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला ४ किंवा ६ अंकी UPI पिन टाकावा लागेल, तर UPI Lite द्वारे पैसे पाठवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पिनची आवश्यकता नाही.

युपीआय देशातील ३०० हून अधिक बँका आणि पेमेंट अॅप्सवर उपलब्ध आहे. पण UPI Lite च्या सेवा फक्त ९ बँकांद्वारे पुरवल्या जात आहेत. यासोबतच ते फक्त BHIM अॅपवर वापरता येणार आहे.

Upi and Upi Lite: कोणता पर्याय तुमच्यासाठी आहे बेस्ट?

आता तुम्हाला UPI आणि UPI Lite मधील सर्व प्रमुख आणि महत्त्वाचे फरक कळले असतीलच. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार आणि पैशाच्या सुरक्षिततेनुसार तुम्ही दोनपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

Maharashtra Politics 2024 : मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ; नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT