Married Daughter's right on Father’s property: भारतात साधारणपणे वडिलांची मालमत्ता ही मुलांनाच मिळते. देशातील एक मोठा वर्ग आजही ही परंपरा पाळत आहे. आई-वडीलही त्यांची संपत्ती फक्त मुलांमध्येच विभाजित करतात. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आजही बहुतेक पालक आपल्या मुलींना मुलांपेक्षा कमी समजतात.
यातच अनेक लोकांना असे वाटते की मुलगी लग्नानंतर दुसऱ्या घरात जाते आणि लग्नानंतर सासरच्या संपत्तीत तिचा वाटा होतो. मात्र यामागेही अनेक नियम आणि कायदे आहेत. विवाहित मुलगी तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकते का? आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा 2005 नुसार (Hindu Succession (Amendment) Act, 2005) मुलांप्रमाणेच मुलीलाही वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क आहे. मग त्यांचे लग्न झाले असेल किंवा नाही. त्यामुळे विवाहित मुलीही वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतात.
मात्र वडिलांनी मृत्यूपूर्वी मृत्यूपत्रात मुलीचा समावेश केला नसेल तर मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही. (Latest News)
सर्वोच्च न्यायालयाच्या (SUPREME COURT) म्हणण्यानुसार, हिंदू धर्मातील मुलीचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर जन्माच्या क्षणापासून समान हक्क असतो, मग तिचे वडील हयात असोत किंवा नसोत. हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा 2005 चे नियम हिंदू धर्मातील महिलांना तसेच बौद्ध, शीख, जैन, आर्य समाज आणि ब्राह्मो समाजातील मुलींना लागू होतात.
दरम्यान, हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा 2005 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व उच्च न्यायालयांना अशा प्रकरणांचा 6 महिन्यांत निपटारा करण्याचे निर्देश दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.