Republic Day canva
लाईफस्टाईल

Republic Day: प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडा फडकवण्यामध्ये नेमका काय फरक? ही गोष्ट प्रत्येकाला माहितीच हवी

Republic Day 2025 : प्रत्येक वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. २६ जानेवारीला नवी दिल्लीतल्या इंडिया गेटजवळील कार्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची भव्य परेड पाहण्यासाठी देश आतुरतेने वाट पाहत असतो.

Saam Tv

प्रत्येक वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. २६ जानेवारीला नवी दिल्लीतल्या इंडिया गेटजवळील कार्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची भव्य परेड पाहण्यासाठी देश आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच लहान मुलं शाळेमध्ये मोठ्या जल्लोषात हा दिवस साजरा करतात. या वेळेस झेंडा फडकवतात. असाच १५ ऑगस्टला सुद्धा ध्वजारोहण करतात. मात्र या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे, हे आपण पुढील माहीती द्वारे समजून घेणार आहोत.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आणली गेली. यामुळेच भारताला लोकशाही मिळाली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात प्रजासत्ताक होण्याचा पहिला वर्धापनदिन २६ जानेवारी १९५१ साली करण्यात आला. यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारल्याला ७५ वर्ष पुर्ण होणार आहे. आणि ७६ वर्ष सुरू होणार आहे. पण स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण आणि प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहन यात जमीन आस्मानाचा फरक आहे.

बऱ्याच जणांना माहीत नसतं की, स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण करणं आणि प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण करणं यात खूप फरक असतो. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन्ही दिवशी तिरंगा झेंडा फडकवला जातो. पण त्याच्या पद्धतीत फरक असतो. ते म्हणजे १५ ऑगस्टला ध्वजारोहन केलं जातं. तर २६ जानेवारीला झेंडा फडकवला जातो. म्हणजेच Flag Unfurling केलं जातं.

फरक काय आहे?

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झेंडा खांबाच्या टोकाला बांधला जातो. जेव्हा राष्ट्रपती दोरी खेचतात तेव्हा झेंडा फडकू लागतो. त्याला झेंडावंदन किंवा झेंडा फडकावणं म्हणतात.

तर, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रीय ध्वज फडकवण्याआधी तो खांबाला बांधून ठेवला जातो. खांबाच्या टोकाला थोडा खाली ध्वज बांधला जातो. पंतप्रधान हा राष्ट्रीय ध्वज फडकवतात. दोरी खेचून तिरंगा वर जातो आणि मग तो फडकावला जातो. त्याला ध्वजारोहण म्हणतात.


Edited By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

SCROLL FOR NEXT