Swimmer's Ear Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Swimming: स्विमिंग करताना तुमच्याही कानात पाणी जातं? मग वेळीच उपचार घ्या, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार

Swimmer's Ear Disease: स्विमिंग करताना अनेकदा कानात पाणी जाते. यामुळे कानात इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकांना पोहायला आवडते. त्यामुळे अनेकजण स्विमिंग क्लास लावतात. स्विमिंग करताना पुलमधील पाणी आपल्या नाका-तोंडात, कानात जाते. हे पाणी खराब असण्याची शक्यता असते. या पाण्यात तुमच्याआधी अनेकजण पोहून गेले असतील. त्यामुळे खूप जंतू साचण्याची शक्यता असते. तसेच जर हे पाणी तुमच्या कानात गेले आणि त्यामुळे तुम्हाला इनफेक्शन झाले तर तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. तुम्हाला स्विमर्स ईअर नावाचा आजार होऊ शकतो. तसेच अंघोळीचे पाणीदेखील तुमच्या कानात गेले तर तुम्हाला हा आजार होऊ शकतो.

स्विमिंग किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेल्याने इन्फेक्शन होणं. जेव्हा तु्म्ही जंतू असलेल्या पाण्यात पोहण्यासाठी जातात. तेव्हा पाणी गेल्याने हा आजार होऊ शकतो.

स्वीमर्स ईअर्स आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकते. लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्येही या आजाराची लक्षणे दिसून येतात. आंघोळ करताना, केस धुताना किंवा ओलसर किंवा दमट वातावरणात पाणी किंवा ओलावा कानात साचल्यास हा संसर्ग होतो. इअल प्लग, इअरबड्स आणि श्रवणयंत्र घातल्यानेदेखील हा आजार होऊ शकतो.

स्विमर्स ईअरची लक्षणे

कानात वेदना होणे, कानाच्या आत खाज येणे, कानात एका प्रकारचा दाब जाणवणे, कान सतत ओलसर असणे, कानात पू असणे, कानात जळजळ होणे, कान आतून बाहेर लाल होणे. तसेच कानाच्या आतील आणि बाहेरील बाजूस सूज येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

उपचार

तुम्हाला जर हा आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. शक्यतो दुषित पाण्यात जाणे टाळा. दुषित पाण्यात गेल्यानंतर तुमच्या कानात पाणी जाण्याची शक्यता असते. पाणी गेल्याने जंतूमुळे इंफेक्शन होऊ शकते. त्यामुळे स्विमिंग करुन आल्यावर आणि अंघोळीनंतर कान पुसून स्वच्छ करा.

काळजी कशी घ्याल

स्विमिंग करुन आल्यावर आणि अंघोळीनंतर तुमचे कान कोरडे करा. कान ओले ठेवल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. पोहताना इअरप्लग घाला त्यामुळे पाणी कानात जाणार नाही. यानंतर कान मऊ कापसाने स्वच्छ करा. डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT