PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

PM Vishwakarma Yojana: केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. या योजनेत नागरिकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी ३ लाखांचे लोन दिले जाते.
PM Vishwakarma Scheme
PM Vishwakarma YojanaSaam Tv
Published On
Summary
  • केंद्र सरकारची पीएम विश्वकर्मा योजना

  • नागरिकांना मिळते ३ लाखांपर्यंतचे लोन

  • कोणत्याही गॅरंटीशिवाय व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळते लोन

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. नागरिकांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करावा, या उद्देशाने काही योजना राबवण्यात आल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना. केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजना राबवून तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहेत. लहान कारागिरांना आपला व्यवसाय मोठा करण्याची संधी दिली आहे. या योजनेत नागरिकांना कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन दिले जाते. याचसोबत आर्थिक मदतदेखील दिली जाते.

PM Vishwakarma Scheme
Free Mobile Scheme: केंद्र सरकार देणार मोफत स्मार्टफोन? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? (PM Vishwakarma Yojana)

पीएम विश्वकर्मा योजना सोनार, लोहार, न्हावी यांसारखे कौशल्य येत असणाऱ्या नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये १८ ट्रेडमधील नागरिकांचा समावेश आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत सुतार, बोटी तयार करणारे, मातीची भांडी बनवणारे, कुंभार, शिल्पकार या लोकांना फायदा मिळतो.

मिळते ३ लाखांचे लोन (PM Vishwakarma Yojana Get 3 Lakh Rupees Loan)

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत जर या व्यक्तींना स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असेल तर लोन मिळते. या योजनेत नागरिकांना ३ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळते. पहिल्या टप्प्यात १ लाखांचे लोन त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. या लोनवर फक्त ५ टक्के व्याजदर आकारले जाते.

पीएम विश्वकर्मा योजनेत फक्त लोन नव्हे तर या कारागिरांना ट्रेनिंगदेखील दिले जाते. याचसोबत रोज ५०० रुपयांची स्टायपेंड दिली जाते.याचसोबत प्रमाणपत्र, ओळखलपत्र, १५००० रुपये टुलकीट दिले जाते.

PM Vishwakarma Scheme
Government Scheme: ना व्याज, ना गॅरंटी, आता घ्या ५ लाखांचे लोन; सरकारने सुरु केली नवी योजना

पात्रता (PM Vishwakarma Yojana Eligibility)

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा. १८ ते ५० वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, निवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

PM Vishwakarma Scheme
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये
Q

पीएम विश्वकर्मा योजना काय आहे?

A


ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. यात सुतार, कुंभार, सोनार, लोहार यांसारख्या १८ ट्रेडमधील लोकांना लाभ मिळतो.

Q

या योजनेत किती रुपयांचे लोन मिळते?

A


या योजनेअंतर्गत एकूण ₹३ लाखांचे कर्ज मिळते. पहिल्या टप्प्यात ₹१ लाख, आणि दुसऱ्या टप्प्यात ₹२ लाखांचे कर्ज मिळते.

Q

लोन घेण्यासाठी गॅरंटी लागते का?

A

नाही. हे कर्ज कोणत्याही गॅरंटीशिवाय दिले जाते. फक्त ५% व्याज दर आकरले जाते.

Q

कोण अर्ज करू शकतो?

A

१८ ते ५० वयोगटातील भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. त्यांच्याकडे या १८ ट्रेडमधील एकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com