Sunita Williams  Saam Digital
लाईफस्टाईल

Sunita Williams News : दिर्घकाळ अंतराळात राहिल्यास होवू शकतो गंभीर आजार? स्पेस ॲनिमिया म्हणजे काय? वाचा सविस्तर...

Rohini Gudaghe

मुंबई : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स दीर्घकाळापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकल्या आहेत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अद्याप पृथ्वीवर परतता आलेले नाही. जास्त वेळ अंतराळात राहिल्यास सुनीता यांना गंभीर आजार होवू शकतो, अशी माहिती आता समोर येत आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना दिर्घकाळ अंतराळात राहिल्यास स्पेस ॲनिमियासह आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपण स्पेस ॲनिमिया या आजाराबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

दिर्घकाळ अंतराळात राहिल्यास...

सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे अंतराळवीरांना स्पेस ॲनिमियाला अनेकदा सामोरे जावे लागते. अंतराळात प्रवेश केल्यानंतर लाल रक्तपेशींवर परिणाम होतो. त्यांची संख्या कमी होण्यास सुरूवात (What is space anemia condition) होते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवतो. मानसिक कार्यक्षमता कमी होऊ लागते. सध्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना दीर्घ काळ अंतराळात मुक्काम केल्यामुळे अशा आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

स्पेस ॲनिमिया म्हणजे काय?

स्पेस ॲनिमिया (Space Anemia) ही अशी स्थिती आहे, जिथे अंतराळवीरांना अंतराळात असताना लाल रक्तपेशी कमी झाल्याचं जाणवतं. अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणाच्या संपर्कामध्ये असताना शरीर लाल रक्तपेशी तयार करत नाही, उलट त्या नष्ट होण्यास सुरूवात होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता विल्यम्सला हाडांची झीज, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी समस्या जाणवू शकतात.

पृथ्वीवर आपलं शरीर दर सेकंदाला २ दशलक्ष लाल रक्तपेशी तयार करतं आणि नष्ट देखील करतं. परंतु, सहा महिन्यांच्या अंतराळ मोहिमेदरम्यान नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असं दिसून आलंय (Sunita Williams) की, अंतराळवीरांचे शरीर प्रति सेकंद ३ दशलक्ष पेशी नष्ट करत आहेत. एका अहवालात नासाने खुलासा केलाय की, अंतराळवीर अंतराळात प्रवेश केल्यानंतर लगेचच ही प्रक्रिया सुरू होते. लाल रक्तपेशी नष्ट करून शरीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासोबत जुळवून घेते.

अंतराळ मोहिमेदरम्यान आरोग्याचा समस्या...

अनेकदा अंतराळात शरीराला संतुलन राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामुळे देखील लाल रक्तपेशींची एकूण संख्या कमी होते. यामुळे अशक्तपणा, थकवा, अशक्तपणा आणि शारीरिक कार्यक्षमता होते. यामुळे हृदय देखील धीम्या गतीने कार्य करू शकते. अंतराळातील गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे हाडांची झपाट्याने झीज होऊ शकते, असं देखील गुरुग्राम येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्चचे डॉ. राहुल भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार समोर (Sunita Williams News) आलंय. ही सर्व माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे. अंतराळवीरांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी स्पेस ॲनिमियावर संशोधन सुरू आहे. नासा विस्तारित अंतराळ मोहिमेदरम्यान याचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT