नासाने अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 8 दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात पाठवलं होतं. दोघंही 13 जून रोजी पृथ्वीवर परतणार होते, मात्र यानात बिघाड झाल्यामुळे प्रतीक्षा वाढतच गेली. आज त्यांना अंतराळात जाऊन जवळपास 54 दिवस पूर्ण झाले आहेत. अशा परिस्थितीत सुनीता विल्यम्स कधी परतणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नासा त्यांना परत आणण्यासाठी कोणती योजना आखत आहे?
ज्या स्टारलाइन यानातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळ मोहिमेवर पाठवण्यात आलं होतं, त्या यानात हेलियम गळती सुरू झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर डॉकिंग करताना त्याचे थ्रस्टर्सही निकामी झाले. त्यामुळे दोन्ही अंतराळवीरांचं मायदेशी परतणं लांबलं आहे. नासाकडून आत्तापर्यंत मिळालेल्या विधानांनुसार किंवा संकेतांनुसार सध्या सर्व काही ठीक असल्याचं दिसत असून, सुनीता आणि विल्मोर लवकरच सुखरूप घरी परततील, असा विश्वास आहे.
नुकताच सुनीता विल्यम्स यांनी या मोहिमेबाबत अवकाशातून संदेश पाठवा होता. यात सुनीता विल्यम्स म्हणाल्या होत्या की, त्यांना पूर्ण विश्वास आहे की हे यान त्यांना घरी आणेल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन ISS मध्ये कोणतीही अडचण नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. नासाच्या टीमने हेलियम सिस्टमची चाचणी केली आहे. दरम्यान स्टारलाइनरने आशा व्यक्त केली आहे की सुनीता विल्यम्स ऑगस्ट महिन्यात पृथ्वीवर परत येऊ शकतात, मात्र तरीही लँडिंगची तारीख अद्याप ठरलेली नाही.
महिनाभरापूर्वी नासाने या मोहिमेची मुदत ९० दिवसांसाठी वाढवली होती. अंतराळवीरांना दीर्घकाळ राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सुरक्षित ठिकाण आहे. त्यामुळे अंतराळवीरांना परत आणण्याची आम्हाला घाई नाही, असे नासाने म्हटले होतं. या दृष्टीकोनातून, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी NASA कडे अजून 60 दिवसांचा अवधी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.