Pink Rickshaw Yojana Saam Tv
लाईफस्टाईल

Pink Rickshaw Yojana काय आहे? कोणत्या राज्यातील महिलांना होणार लाभ? जाणून घ्या

Pink Rickshaw In Maharashtra : महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सरकार नवनवीन योजना काढत असतात. महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे.

Shraddha Thik

Pink Rickshaw Yojana For Womens :

महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सरकार नवनवीन योजना काढत असतात. महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे. पिंक रिक्षा या योजनेचे नाव, या योजनेत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिला व बालविकास विभागाच्या योजनांचे आढावे घेताना मंत्री तटकरे मंत्रालयातील दालनात म्हणाल्या, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, लाभार्थ्यांचे निवड करणे, बँका निवडणे तसेच प्रशिक्षण आणि पात्रता या सर्व बाबींचा तपशील चाचणी करून घ्याव्यात.

पिंक रिक्षा ही योजना (Yojana) राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू करणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठीकाणांवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

भारतात (India) या पिंक रिक्षा महिलांसाठी सामान्य ऑटो रिक्षाला पर्याय असेल. या रिक्षांमधून महिलांचा छळ आणि गैरवर्तन पूर्णपणे टाळता येईल असे भारत सरकारचे उपक्रम असल्याचे कळते. महिला सुरक्षेसाठी पॅनिक बटसह जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम यांसरखे विशेष फीचर (Feature) रिक्षात बसवण्यात आले आहेत.

पिंक रिक्षा ही पूर्णपणे गुलाबी रंगाची आहेत, किंवा त्यांचे छत गुलाबी रंगाचे आहेत. महिलांसोबत गैरवर्तन तसेच लैंगिक अत्याचार आणि बलात्कारांपासून संरक्षणासाठी भारत सरकारने रांचीमध्ये पहिले पाऊल उचलले.

पहिल्यांदा रांचीमध्ये पिंक रिक्षा ही 2013 सालमध्ये सुरू करण्यात आली. काही काळांतर भारतात अनेक शहरांमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कायदेशीर पडताळणी केल्यावर तसेच कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रशिक्षित व्यावसायिक आणि मुख्य म्हणजे महिला या रिक्षा चालवतात.

दरम्यान, मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांच्या आरोग्या विषयीसंबंधीत काही निर्णय घेणार आहेत. तसेच महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत शाळा, महाविद्यालये, गरीब आणि गरजू लाभार्थी महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्याबाबत आणखीन एक योजना राबवावी अशी सुचना दिल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन आक्रमक

नांदेडच्या लॉजमध्ये आढळला शिक्षकाचा मृतदेह; हत्या ती आत्महत्या? नक्की घडलं काय?

Uddhav Thackeray: इंडिया आघाडीच्या बैठकीची तारखी ठरली, उद्धव ठाकरे-राहुल गांधींमध्ये चर्चा; दिल्लीमध्ये राजकारण तापणार

Breaking : घराला बॉम्बने उडवून टाकू! मित्राचा फोन घेतला अन् केंद्रीय मंत्र्याला धमकी दिली, नागपुरात खळबळ

Chawli Rassa Bhaji Recipe : चवळीला द्या मालवणी तडका, बनवा झणझणीत रस्सा भाजी

SCROLL FOR NEXT