What Is Monkeypox Saam TV
लाईफस्टाईल

What Is Monkeypox : मंकीपॉक्स म्हणजे नेमकं काय? वाचा आजाराची लक्षणे आणि उपाय

Ruchika Jadhav

मंकीपॉक्स या विषाणूने अन्य देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. भारताच्या शेजारी असलेला देश पाकिस्तानमध्ये सुद्धा मंकीपॉक्स व्हायरसने शिरकाव केला आहे. विविध देशांतील एकंदर परिस्थिती पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. तसेच यानंतर राज्य सरकारमार्फत आरोग्य यंत्रणेकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

अशात मंकीपॉक्स म्हणजे नेमकं काय? याचा संसर्ग कसा होतो? आपल्याला हा आजार झाल्याचं कसं ओळखायचं? तसेच यावर काय उपाय करावेत? या सर्वच प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स म्हणजे विषाणूजन्य झुनोटिक रोग किंवा आजार होय. यामध्ये शरीरावर पुरळांसारखी लक्षणे जाणवतात. या आधी झालेल्या संशोधनादरम्यान मंकीपॉक्स विषाणू 1958 मध्ये माकडांच्या वसाहतीत पहिल्यांदा आढळला होता. आता पुन्हा एकदा हा विषाणू वेगाने पसरत चालला आहे.

मंकीपॉक्स आजार झाल्यास कोणती लक्षणे जाणवतात?

ज्या व्यक्तींना मंकीपॉक्सची लागण होते त्यांना सतत ताप येणे, डोके दुखी, प्रचंड अशक्तपाणा सुद्धा जाणवतो. तसेच महत्वाचे म्हणजे कांजण्यांप्रमाणे अंगावर बारीक पुरळ उठतात. दोन ते चार आठवड्यांपर्यंत ही लक्षणे तीव्र होतात.

प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत?

मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे याची लागण झालेल्या व्यक्तीला तातडीने वेगळे करावे.

रुग्णाने वापरलेल्या कोणत्याही वस्तूला थेट संपर्क करू नका.

सतत हात स्वच्छ धुवून घ्या. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT