heart attack yandex
लाईफस्टाईल

Minor Heart Attack: मायनर हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?

Minor Heart Attack Symptoms: मायनर हार्ट अटॅक म्हणजे काय, याची सुरुवातीची लक्षणे कोणती जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही वर्षांपासून हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ताणतणाव यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढला आहे. संसर्गजन्य रोग आणि कर्करोग व्यतिरिक्त, हार्ट अटॅक हे मृत्यूचे सर्वात सामान्य कारण आहे. डॉक्टरांच्या मते, हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस किंवा महिने आधी मायनर हार्ट अटॅक येऊ शकतो. परंतु, काही लक्षणे वेळीच ओळखून मायनर हार्ट अटॅकचे मेजर हार्ट अटॅकमध्ये रूपांतरित होण्यापासून रोखता येते. पण मायनर हार्ट अटॅक म्हणजे काय, याची सुरुवातीची लक्षणे कोणती, जाणून घेऊयात.

मायनर हार्ट अटॅक म्हणजे काय?

मायनर हार्ट अटॅकला वैद्यकीय भाषेत NSTEMI (नॉन-ST एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन) म्हटले जाते. या स्थितीत, हृदयाच्या धमन्या पूर्णपणे ब्लॉक होत नाहीत, तर अंशतःच ब्लॉक होतात. याचा अर्थ हृदयात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह काही प्रमाणात चालू राहतो, परंतु सामान्यपेक्षा कमी. मायनर हार्ट अटॅकची लक्षणे मेजर हार्ट अटॅक इतकी गंभीर नसतात. परंतु, तरीही याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

मायनर हार्ट अटॅकची लक्षणे कोणती?

छातीत जडपणा जाणवणे किंवा वेदना होणे

श्वास घेण्यात अडचण होणे

थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

हात, खांदे, मान किंवा पाठीत सौम्य वेदना जाणवणे

घाम येणे किंवा अस्वस्थ वाटणे

या गोष्टी टाळा

तेलकट आणि प्रोसेस्ड फूड खाणं टाळा. याऐवजी फळे आणि भाज्या जास्त खा. दररोज हलका व्यायाम किंवा वॉक करा. हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सततचा ताण हा हृदयरोगाचे एक प्रमुख कारण आहे, म्हणून योग आणि ध्यान करा .धूम्रपान आणि मद्यपान टाळा, हे हृदयाच्या आरोग्याला सर्वात जास्त नुकसान करतात.

मायनर हार्ट अटॅक हे मेजर हार्ट येण्याआधी एक अलार्म असतो. मायनर हार्ट अटॅकची लक्षणे वेळी ओळखल्याने जीव वाचवला जाऊ शकतो. यामुळे मायनर हार्ट अटॅकचे लवकरात लवकर निदान करणे आणि वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो आणि मृत्यू देखील होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaitanyanand Swami: विद्यार्थिनींना धमकावून चैतन्यानंद सरस्वतीकडे पाठवायच्या, इन्स्टिट्यूटच्या ३ महिला अधिकाऱ्यांना अटक

Shocking : मोबाईलवर गेम खेळू नको, बहीण ओरडली; रागाच्या भरात भावाचा टोकाचा निर्णय

हैदराबाद विरुद्ध ब्रिटिश गॅझेटियरवरुन वाद?मुंडेंच्या टीकेला जरांगेंचं वादग्रस्त उत्तर

Scholarship: सरकारनं घेतला विद्यार्थ्यांच्या भल्याचा निर्णय; नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल दुप्पट शिष्यवृत्ती

दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रं पूजन, हैदराबाद गॅझेटियरला मुंडेंचा विरोध?

SCROLL FOR NEXT