ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना मासे खायला खूप आवडतात, पण तुम्हाला माहित आहे का की माशासोबत हे पदार्थ खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, जाणून घ्या.
माशासोबत दूध किंवा दही खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे पोटात गॅस आणि जडपणा येऊ शकतो.
माशासोबत गोड फळे किंवा केळी खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढू शकते आणि कधीकधी ऍलर्जी किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
माशासोबत पनीर किंवा चीजसारखे पदार्थ खाल्ल्याने अन्नाचे पचन मंदावते आणि पोटदुखी होऊ शकते.
माशासोबत कोल्ड्रिंक्स किंवा सोडा प्यायल्याने पोटात अॅसिडिटी वाढते आणि त्यामुळे अपचन किंवा छातीत जळजळ होऊ शकते.
इतर मांसाहारी पदार्थ किंवा सीफूडसोबत मासे खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
माशासोबत बटाटे किंवा इतर स्टार्चयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात.