दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रं पूजन, हैदराबाद गॅझेटियरला मुंडेंचा विरोध?

Hyderabad Gazette Satara Gazette: दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रंपूजन कऱण्यात आलंय.. दसरा मेळाव्यात जातीपातीच्या सीमोल्लंघन अपेक्षित असताना या मेळाव्यानंतर नव्या वादाचा भडका उडण्याची शक्यता आहे.. मात्र दसरा मेळाव्यात नेमकं काय घडलं? दसरा मेळाव्यातून आरक्षणाचं शस्त्रंपूजन कसं करण्यात आलय?
At Dussehra rally, Munde siblings and Manoj Jarange perform symbolic reservation weapon worship, intensifying Maratha quota battle in Maharashtra
At Dussehra rally, Munde siblings and Manoj Jarange perform symbolic reservation weapon worship, intensifying Maratha quota battle in MaharashtraSaam Tv
Published On

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह मनोज जरांगेंनीही आरक्षणाचं शस्त्रं पूजन केलंय.. भगवान भक्ती गडावरुन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावर भाष्य केलंय...आमच्या लेकरांच्या ताटातलं आरक्षण घेऊ नका, म्हणत मुंडेंनी मराठा आरक्षणावरच भाष्य केलंय

दुसरीकडे मनोज जरांगेंनीही नारायण गडावरुन सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय.. एवढंच नाही तर आरक्षणाचा वाद आता पक्षीय राजकारणापर्यंत पोहोचलाय . पंकजा मुंडेंच्या पक्षाकडून उभं राहणाऱ्यांना पाडण्याचं आवाहनच मनोज जरांगेंनी केलंय..

दसरा मेळावा हा विचारांचं सोनं लुटण्याचा सण...दसरा मेळाव्यातून समाजाला दिशा देणं अपेक्षित आहे. मात्र आता दसरा मेळावा म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा मंच झाला आहे... भगवान भक्तीगडावरुन मुंडेंनी आरक्षणावर केलेलं भाष्य आणि त्याला जरांगेंचं प्रत्युत्तर म्हणजे आरक्षणाचं शस्त्रं पूजनच आहे... दसऱ्याला जातीपातींच सीमोल्लंघन करण्याेवजी राजकीय नेते त्यातचं गुंतून राज्याची सामाजिक वीणच उसवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com