Magh Bihu 2023 : वर्षभरातून सूर्य बारावेळा राशी बदलत असतो. सूर्य जेव्हा एका राशी मधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती असं संबोधलं जातं. अशातच उत्तर भारतामध्ये मकर संक्रांतीला उत्तरायण, तिळगूळ, खिचडी अशा अनेक नावांपासून ओळखलं जातं.
अशातच आसामी लोकांमध्ये मकर संक्रांतीच्या सणाला बिहू माघ या नावाने ओळखलं जातं. बिहु माघ म्हणजे नेमक काय आणि मकर संक्रांतीला बीहू का म्हटले जाते हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
बऱ्याचदा माघ बीहु हा सण (Festival) जानेवारी महिण्यामध्ये साजरी केला जातो आणि शेतीची कापणी देखील याच महिन्यात संपते. आसाम मधील पारंपरिक कॅलेंडरनुसार या वर्षी बिहू हे पर्व 15 जानेवारी 2023 या दिवशी साजरी केला जाणार आहे.
माघ बिहूचा तिथि चंद्र आसाम मधील कॅलेंडरमध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळी असते. बीहू या शब्दाची उत्पत्ती विशू या शब्दापासून झाली आहे. शांतीच्या शोधत असणे असा या शब्दाचा अर्थ होतो. बिहू आसामचा एक पारंपरिक सण मानला जातो.
ज्याला कृषी (Agriculture) आणि सामाजिक दृष्ट्या अधिक महत्व दिलं गेलं आहे. कृषी म्हणजेच बीहूचे हे दिवस पीक घेण्याच्या शेवटच्या दिवसांच प्रतीक मानलं जातं. बीहूच्या दिवसांत कृषीचे देवता आणि तेथील पूर्वजांना नमस्कार करून भरपूर पीक, भरपूर अन्नधान्य, सुख, समाधान आणि शांती या सगळ्याचा आशीर्वाद मागितला जातो.
सामाजिकरित्या सांगायचं झालं तर बीहू हा सण मैत्री आणि जिव्हाळ्याचे संबंध आणखीन घट्ट करण्यास मदत करतो. कारण की या पर्वात प्रत्येक समुदायातील लोक मिळून मिसळून हा सण साजरा करतात.
बिहू हा सण थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. या दिवशी सगळे लोक नदीमध्ये अंघोळ करतात. यासोबत सार्वजनिक जगेवरती सुक्या चाऱ्यासारख्या गवता पासून झोपडी बनवतात ज्याला भेला घर असं म्हणतात.
त्याचबरोबर या जागेवरती सात्विक पकवान बनवले जाते. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून प्रसाद समजून स्वतः देखील अन्नाचा आस्वाद घेतात. भेला घराजवळ बांस आणि पुआलची आणखीन एक झोपडी बांधली जाते.
तिला मेजी या नावाने ओळखलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व लोक एकत्र जमुन मेजीला आग लावतात. त्याचबरोबर आग लावलेल्या मेजि भोवती एकत्र गोळा होऊन आनंद साजरी करतात. नाचगाणे यांसारख्या आणि बऱ्याच गोष्टी करतात. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मेजीची राख शेतामध्ये टाकून देतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.