Manasvi Choudhary
उन्हाळ्यात शरीराची लाहीलाही होते. शरीरातून सतत घाम येतो असतो यामुळे केस देखील खराब होतात.
मानेवर घाम आल्याने केस देखील खराब होतात. घामामुळे केस खराब, चिकट होण्याची समस्या उद्भवते. उन्हाळ्यात केस घामामुळे खराब होऊ नये म्हणून केसांच्या 5 हेअरस्टाईल तुम्ही करू शकता.
केसांची वरच्या बाजूने खालपर्यंत वेणी बांधा. हाय ब्रेड हेअरस्टाईलमुळे केस घामापासून सुरक्षित राहतील. केस खराब होणार नाही.
हायपोनी हेअरस्टाईल ही अत्यंत सोपी आणि स्टायलिश हेअरस्टाईल आहे. केसांचा उंच पोनी घालून केस मोकळे सोडा यामुळे मानेवर घाम येणार नाही.
उन्हाळ्यात केसांची टू साइड बन हेअरस्टाईल करा. केसांच्या मधे भांग पाडून दोन्ही बाजूला अंबाडा घाला. ही एक युनिक आणि स्टायलिश हेअरस्टाईल आहे.
एखाद्या कार्यक्रमासाठी, साडी किंवा ट्रेडिशनल लूकवर तुम्ही केसांचा मेस्सी लो बन बांधू शकता.
केस मोकळे सोडण्यापेक्षा तुम्ही डच ब्रेड्स हेअरस्टाईल करू शकता. केसांची लांबलचक वेणी घाला यामुळे केसांमध्ये घाम येणार नाही.