Manasvi Choudhary
प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल मालती चहरच्या हॉटनेसने सोशल मीडियावर कहर केला आहे. अभिनेत्री मालतीने इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशुटमध्ये तुम्ही पाहू शकता की, धबधब्याखाली मालतीने फोटोशूट क्लिक केलं आहे. बिकिनी लूकमधील मालतीच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मालतीने कुल अंदाजात हे फोटोशूट क्लिक केलं आहे. तिने बिकिनी घातली आहे यामुळे तिचा बोल्ड लूक समोर आला आहे.
मालती चहर २०१८ मध्ये आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससाठी चीयर अप करताना कॅमेऱ्यात टिपली गेली ज्यामुळे सर्वत्र लोकप्रिय झाली.
त्यानंतर तिची चर्चा क्रिकेटर दीपक चहरची बहीण असल्यामुळे अधिक झाली. मालती अनेकदा क्रिकेटच्या स्टेडियममध्ये दिसलीये.
मनोरंजसृष्टीविषयी सांगायचं तर, मालती बिग बॉस १९च्या घरात दिसली होती. तिची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती.
याशिवाय २०१८ पासून मालतीचा बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय सहभाग आहे. तिने जीनियस या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर तिने इश्क पश्मीना, साडा व्याह होया जी या चित्रपटात काम केले आहे.
मालती चहर इंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधी क्रिडाक्षेत्रात सक्रिय होती. नॅशनल लेव्हल च्या गोळाफेक आणि लांब उडी स्पर्धा तिने जिंकल्या आहेत.