Diabetes Diet saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Diet: बद्धकोष्ठता-डायबिटीजला नैसर्गिक उपाय! 'ही' ५ कडधान्यं ठरतील फायदेशीर

Diabetes Health: डायबिटीज हा आजार लाइफस्टाइलसाठी फार गंभीरचं आहे. या आजारात तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देले नाही तर त्याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो.

Saam Tv

डायबिटीज हा आजार लाइफस्टाइलसाठी फार गंभीरचं आहे. या आजारात तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देले नाही तर त्याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. या आजारात तुम्हाला नकळत अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर हळूहळू दिसायला लागतो. यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा उपचार म्हणजे तुमच्या ताटातले रोजचे अन्न आहे.

डायबिटीजच्या रुग्णांनी कोणताही पदार्थ खाताना ब्लड शुगर वाढणार तर नाही ना? असा विचार केला पाहिजे. डायबिटीजच्या रुग्णांच्या आहारात सगळ्यात सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा आहार हेल्दीच हवा. मग अशा रुग्णांनी नेमकं काय खाल्लं पाहिजे हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी पुढील माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

डायबिटीजच्या रुग्णांनी नाश्त्यात कोणते पदार्थ खावेत?

डायबिटीजच्या रुग्णांनी प्रोसेस्ड फूड खाणे सगळ्यात आधी टाळले पाहिजे. हे पदार्थ खाल्याने त्यांना हमखास बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. तर डायबिटीजच्या रुग्णांनी रुग्णांनी कॅलेरीज कमी असलेले पदार्थ नाश्त्यात खावेत. त्याने तुमचे पोट जास्तकाळ भरलेले किंवा गज्ज वाटणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मोड आलेले कडधान्य खाऊ शकता. तसेच तुम्ही अळशीच्या बियांचा समावेश तुमच्या आहारात करु शकता.

कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे आणि धान्य

डायबिटीजच्या रुग्णांनी फळे निवडाताना काळजी घ्यावी. कारण त्यात ग्लुकोज असते. मग तुम्ही सफरचंद, पेरू, नाशपती आणि संत्री या छोट्या आकारांच्या फळांचा वापर करू शकता. त्याचसोबत तुम्ही गरम सुप, नारळ पाणी, स्मुदी यांसारख्या पदार्थांचे सेवन करू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT