Google Gemini : हवी ती फ्रेम, हवा तो सीन आणि हवा तसा टकाटक व्हिडिओ...Gemini चं नवं फीचर करणार मार्केट जाम! meta ai
लाईफस्टाईल

Google Gemini : हवी ती फ्रेम, हवा तो सीन आणि हवा तसा टकाटक व्हिडिओ...Gemini चं नवं फीचर करणार मार्केट जाम!

AI Technology : व्हिडिओ एडिट करण्यासाठी आता gemini ची मदत होणार आहे. gemini च्या gemini Omni १.१ या फीचरमुळे व्हिडिओ एडिटिंग, सीन्स तयार करणे, व्हिडिओ वाढवणे, क्वाॉलिटी वाढवणे यांसारख्या इतर बऱ्याच कामांसाठी या फीचरची मदत होणार आहे.

Saam Tv

व्हिडिओ एडिट करता करता थकून गेलात? नुसता डोक्याला ताप झालाय? स्क्रीनमध्ये डोळे खूपसून डोळ्यांचं पार वाटोळं झालंय? हा त्रास आणि ही कटकट आता कायमची दूर होणार आहे. कारण Google gemini ने व्हिडिओ एडिटिंगसाठी आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी एक कमालीचं फीचर लाँच केलंय. हे नवीन मॉडेल फक्त एडिटिंगसाठीच नव्हे; तर व्हिडिओ वाढवणे, क्वालिटी वाढवणे अशा इतर बऱ्याच गोष्टींसाठी महत्त्वाचे आणि सोयीस्कर ठरणार आहे.

Google gemini ने कंटेंट क्रिएटरसाठी gemini Omni १.१ हे नवीन फीचर लाँच केले आहे. त्यामुळे व्हिडिओ वाढवण्यापासून ते AI द्वारे सीन्स क्रिएट करण्यापर्यंत हे फीचर सगळंच काम चुटकीसरशी करणार आहे. या नवीन मॉडेलच्या मदतीने तयार व्हिडिओमधील सीन वाढवता येणार आहेत. तसेच ऐनवेळी एआय स्वत:देखील व्हिडिओ तयार करून देऊ शकणार आहे.

या फीचरमध्ये आणखी एक भन्नाट गोष्ट आहे ती म्हणजे, व्हिडिओची पहिली आणि शेवटची फ्रेम आपण ठरवू शकतो. मधला सगळा व्हिडिओ तयार करण्याचं काम gemini Omni १.१ एका झटक्यात करू शकणार आहे. व्हिडिओ ४० सेकंदांपर्यंत वाढवणे देखील या फीचरमुळे शक्य होणार आहे. याशिवाय मूव्हिंग व्हिडिओ शूट, झूम व्हिडिओ शूट किंवा स्लो सीन, फास्ट सीन याशिवाय विविध प्रकारचे कॅमेरा अँगल मूव्हमेंट्स gemini Omni १.१ या फीचरमुळे करणे शक्य होणार आहे.

एखाद्या माणसाचा लूक, बॅकग्राऊंड जसा हवा असेल त्या प्रकारचा व्हिडिओ तुम्ही रेफरन्स म्हणून देऊ शकता; पण याची मर्यादा ३ सेंकदांपर्यंत असणे गरजेचे आहे. gemini Omni १.१ मध्ये १.१ फ्लॅशमध्ये 4K पर्यंत व्हिडिओ तयार करण्याची क्षमता असणारा आहे. पण 4K पर्यंत व्हिडिओची गरज नसेल, तर 360 अँगल मोड देखील Gemini omni 1.1 मध्ये जोडलेला आहे.

कसं वापरायला मिळणार?

डेव्हलपर्स Google AI Studio मध्ये Gemini API च्या माध्यमातून याचा वापर करू शकतात. याशिवाय या फीचरवर सोप्या पद्धतीने व्हिडिओ तयार करता यावा यासाठी documentation, cookbook, prompting guides उपलब्ध करून दिले आहेत.

Google flow च्या मदतीने AI Plus आणि Ultra Subscribers साठी Gemini Omni 1.1 Flash उपलब्ध केला जाणार आहे. या Subscribers ना Gemini secene extension फीचरचा वापर करता येणार आहे.

कसं वापरायला मिळणार?

डेवलपर्सना Google AI Studio च्या मध्ये Gemini API च्या माध्यमातून याचा वापर करू शकतात. याशिवाय या फीचरवर सोप्या पद्धतीने व्हिडिओ तयार करता यावा यासाठी documentation, cookbook, prompting guides उपलब्ध करून दिले आहेत.

Google flow च्या मदतीने AI Plus आणि Ultra Subscribers साठी Gemini Omni 1.1 Flash उपलब्ध केला जाणार आहे. या Subscribers ना Gemini secene extension फीचरचा वापर करता येणार आहे.

जरांगेंची तब्येत बिघडली, आंदोलन चिघळणार? राज्यभरात जरांगेंचे समर्थक रस्त्यावर

Fact Check: महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद? NCMC कार्ड नसलेल्या महिलांना फूल तिकीट?

SIRमुळे महानगरांच्या मतदारांना झटका, 3 जिल्ह्यांमधील 84 लाख मतदार गायब

Nagpur Accident: उपचार घेऊन घरी परतत होते... वाटेतच काळाने गाठलं; पत्नीसमोरच 74 वर्षीय पतीचा हिट अँड रनमध्ये मृत्यू

जरांगेंना उपोषणासाठी लाल गोधडी का लागते? जरांगेंच्या लाल गोधडीचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT