Food Effect On Health
Food Effect On Health Saam Tv
लाईफस्टाईल

Health Care News: दही- बिस्कीटाच्या सेवनाने जडू शकतो मधुमेहाचा आजार? जाणून घ्या कारण

Manasvi Choudhary

Food Effect On Health: सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली आणि फास्टफूड खाण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे आरोग्यावर (Health) दुष्परिणाम होत आहे. केक, बिस्किटे, ब्रेड, दही आणि आइस्क्रिम हे खाद्यपदार्थ खायला सर्वांनाच आवडते. मात्र हे पदार्थ खाताना सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.

या खाद्यपदार्थात असणारे झेंथम आणि ग्वार गम हे इमल्सीफायर्सने समृद्ध असलेले पदार्थ शरीराला हानी पोहोचतात. अशा पदार्थांचे सेवन केल्यास मधुमेहाचा (Diabetes) धोका होण्याची शक्यता असते.

मिड-डेच्या वृत्तानुसार,इमल्सीफायर्स हे अनेकदा प्रक्रिया केलेल्या तसेच हवाबंद पदार्थामध्ये वापरले जाते. हे पदार्थ दिसण्यास आकर्षक असले तरी या पदार्थामध्ये असलेले इमल्सीफायर्स पदार्थाची चव आणि तो पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी वापरले जाते.

इमल्सीफायर्स म्हणजे काय?

इमल्सीफायर हे असे रसायन आहे जे मिश्रण केलेल्या पदार्थांना एकसंध ठेवते. एखाद्या पदार्थांचा आकार आणि मऊपणा कायम राहण्यासाठी इमल्सीफायर वापरले जाते.आइस्क्रिम आणि दही यासांरखे पदार्थ जास्त काळ टिकावे व लवकर वितळू नये म्हणून इमल्सीफायर्स वापरला जातो. विविध प्रक्रिया केलेल्या पदार्थांची चव आणि पोत कायम राहण्यासाठी याचा वापर केला जातो. इमल्सीफायरचा वापर हा सामान्यपणे अन्न, पेये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. ज्यामुळे रक्तातील साखरेचे पातळी वाढते त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

कोणत्या पदार्थात वापरतात इमल्सीफायर

१) ब्रेड आणि भाजलेले पदार्थ

२) दुग्धजन्य पदार्थ जसे की आइस्क्रीम, दही आणि चीज

३) चॉकलेट आणि इतर कन्फेक्शनरी उत्पादने

४) सॅलड ड्रेसिंग आणि सॉस

५) प्रक्रिया केलेले मांस आणि सॉसेज

६) मार्गरीन आणि इतर स्प्रेड

७) नट बटर

८) नॉन-डेअरी दुधाचे पर्याय

९) मिष्टान्न आणि पुडिंग्स

१०) अंडयातील बलक आणि इतर मसाले

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

Sobhita Dhulipala : गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

SCROLL FOR NEXT