Heart Valve Surgery : एकाच दिवसात ५ रुग्णांवर हृदयाचा वॉल्व बदलण्याची प्रक्रिया

Heart Valve Replacement : हृदयाला रक्त पुरवठा करणारी अॅओर्टिक वॉल्व बंद झाल्याने रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झालेल्या पाच रुग्णांवर मुंबईतील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
Heart Valve Surgery
Heart Valve Surgery Saam Tv

Heart Valve Repair :

हृदयाला रक्त पुरवठा करणारी अॅओर्टिक वॉल्व बंद झाल्याने रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झालेल्या पाच रुग्णांवर मुंबईतील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

डॉ. रविंदर सिंग राव (इंटरव्हेंशनल स्ट्रक्चरल कार्डिओलॉजिस्ट आणि टिएव्हीआर आणि मित्रक्लिप तज्ञ) यांच्यासह टीमने एकाच दिवसात पाच रुग्णांवर हृदयाचा (Heart Health) वॉल्व बदलण्याची प्रक्रिया यशस्वी केली आणि या पाचही रुग्णांना नव्याने जीवनदान मिळाले.

डॉ रविंदर सिंग राव (इंटरव्हेंशनल स्ट्रक्चरल कार्डिओलॉजिस्ट टीएव्हीआर आणि मित्रक्लिप तज्ञ) डॉ. नितीन गोखले(विभाग प्रमुख), डॉ.आनंद राव (इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट), डॉ. नम्रता(हृदय विकारतज्ज्ञ), डॉ. कृष्ण प्रसाद इरनिराया(हृदय शल्यचिकित्सक),डॉ रमेश दरगड (फिजिशियन) आणि डॉ. पवन कुमार, (हृदय शल्यचिकित्सक) या संपुर्ण टिमच्या यशस्वी प्रयत्नामुळे एकाच दिवसात पाच विविध रुग्णांवर टिएव्हीआर ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

Heart Valve Surgery
Heart Care Tips : वाढत्या वयानुसार घ्या हृदयाची काळजी, चाळीशीनंतर या ५ टेस्ट कराच!

७९ वर्षाचे मुंबईतील रहिवासी नीलेश शर्मा यांना छातीत जड वाटणे तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. 2002 मध्ये त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली तर 2006 मध्ये प्रोस्टेट शस्त्रक्रिया (TURP) झाली आणि त्यांना उच्च रक्तदाबाची समस्या होती. रुग्णाला गंभीर महाधमनी स्टेनोसिसची समस्या होती. दिवसेंदिवस रुग्णाचे हृदय अकार्यक्षम होत असल्याचे आढळून आले. अशावेळी प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी टिएव्हीआर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

72 वर्षीय श्रीमती नेहा कुमार यांना दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये डाव्या स्तनाचा कर्करोगावर मास्टेक्टॉमी, उच्च रक्तदाब आणि शस्त्रक्रियेने महाधमनी झडप बदलण्यात आली. रुग्ण क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजने (सीओपीडी) ग्रस्त होत्या. रुग्णाची बायोप्रोस्थेटिक व्हॉल्व्ह खराब झाली होती आणि गेल्या 6 महिन्यांपासून दम लागण्यासारख्या लक्षणांसह गंभीर महाधमनी स्टेनोसिसचे निदान झाले. रुग्ण 72 वर्षीय श्रीमती हेमा सिन्हा या लठ्ठपणाने ग्रस्त होत्या. तिला उच्च रक्तदाब, मधुमेह, हायपरलिपिडेमिया आणि ऑस्टियोआर्थरायटिस होता. तिला गंभीर महाधमनी स्टेनोसिसचे निदान झाले होते, त्यांचा बीएमआय ४६ इतका असून त्या लठ्ठपणासारख्या आजाराचा सामना करत होत्या.

Heart Valve Surgery
Heart Attack Risk : महिलांमध्ये वाढतेय हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण! वेळीच घ्या काळजी, डॉक्टरांनी दिला सल्ला

पुण्यातील 85 वर्षीय रुग्ण श्रीमती गीता व्यंकटेश यांना उजव्या स्तनाचा कर्करोग (२०११ मध्ये मास्टेक्टॉमी), २०१२मध्ये कोलन शस्त्रक्रिया (2012) आणि २०२२ पासून पार्किन्सन आजाराने ग्रासले होते. रुग्णाला गंभीर महाधमनी स्टेनोसिस असल्याचे निदान झाले आणि तिचे वाढलेले वय, शारीरीक कमकुवतपणा आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या कोमॉर्बिडीटीमुळे तिला टिएव्हीआर शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. मुंबईतील ६५ वर्षीय रुग्ण श्रीमती रुता पारीख, यांनी मधुमेह मेल्तिस आणि गंभीर महाधमनी स्टेनोसिसचा वैद्यकिय इतिहास होता जानेवारी २०२४ पासून पायऱ्या चढत असताना दम लागण्याची तक्रार जाणवत होती.

या सर्व रूग्णांना गंभीर महाधमनी स्टेनोसिस होते म्हणजेच तीव्र स्वरूपाचे आओर्टिंक स्टेनोसिस असल्याचे निदान झाले. या स्थितीमध्ये महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत.या गंभीर परिस्थितीत त्वरित उपचार आवश्यक आहे कारण यामुळे दम लागणे, हालचालींवर मर्यादा येणे आणि दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. लीलावती हॉस्पिटल हृदयाच्या झडपांच्या कार्यात बिघाड झालेल्या असंख्य रूग्णांवर उपचार करते, त्यांच्यापैकी अनेकांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (TAVR) प्रक्रियेचा फायदा होतो. म्हणून, टुडी इको चाचण्या करून या रूग्णांचे मूल्यमापन केल्यानंतर, तज्ज्ञांनी त्यांचे वय आणि व्हॅाल्व बदलण्याच्या शस्त्रक्रियेचे गुंतागुंतीचे स्वरूप लक्षात घेऊन टिएव्हीआर प्रक्रियेचे नियोजन केले.

Heart Valve Surgery
Sings Of Heart Problem : व्यायाम केल्यानंतर शरीरात ही लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध! येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

डॉ रविंदर सिंग राव( इंटरव्हेंशनल स्ट्रक्चरल कार्डिओलॉजिस्ट टीएव्हीआर, लीलावती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर) सांगतात की महाधमनी स्टेनोसिसचे निदान झाल्यानंतर, 95% ज्या रुग्णांना तातडीने उपचार मिळत नाहीत त्यांना आपला अनमोल जीव गमवावा लागतो. ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) हे महाधमनी स्टेनोसिस असलेल्या रुग्णांसाठी वरदान आहे. ओपन हार्ट सर्जरीचा धोका असलेल्या वृद्ध लोकांसाठी हा एक सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहे. ही कमीत कमी-आक्रमक नॉन-सर्जिकल प्रक्रिया कॅथ लॅबमध्ये केली जाते चिरफाड न करता किंवा हृदयाच्या स्नायूंना इजा न करता हृदयाची खराब झालेली झडप बदलतात.

डॉ राव पुढे सांगतात की, या प्रक्रियेदरम्यान, रुग्णाच्या मांडीतून एक सुई टाकून कॅथेटरच्या सहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते. हीप्रक्रिया 1-2 तास चालते आणि विशेष तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पार पाडली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com