Friendship 
लाईफस्टाईल

Friendship: मुलं आणि मुलींच्या मैत्रीत काय असतो फरक? कोणाची असते स्ट्राँग बाँडिंग?

Friendship: मैत्री अनमोल नातं असतं. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपले मित्र आपल्या मदतीला येतात. त्यामुळे आयुष्यात खरा आणि चांगला मित्र मिळणे खूप गरजेचे आहे. पण तुम्हाला माहितीये पुरुष आणि महिलांच्या मित्रांमध्ये फरक असतो. दोघांच्या मैत्रीमध्ये वेगळेपणा असतो.

Bharat Jadhav

मैत्री काय असते, ती कशी टिकवली जाते. मैत्रीचे फायदे तोटे काय यासंदर्भात अनेकांनी काही वाचलं किंवा ऐकलं असेल. मैत्रीच्या नात्यावर अनेक सिनेमे देखील बनलेत. मग शोले, प्यार का पंचमाना, याराना, मराठी मधील धुमधडकामधील लक्ष्या आणि महेश कोठारे यांची मैत्री, अशी ही बनवाबनवी अशी अनेक चित्रपटांची नावे सांगता येतील, ज्यात मैत्रीच्या नात्यावर भाष्य केलंय. कथा, किस्से, चित्रपट यातून मैत्री काय असते, याची कल्पना आपल्याला आहे. पण तुम्हाला मुलांच्या आणि मुलींच्या मैत्रीमध्ये काय फरक असतो याची कोणी माहिती दिली आहे का?

मुला-मुलींच्या मैत्रीत खूप फरक आहे. हे फरक सामाजिक, भावनिक आणि मानसिक घटकांमुळे पडत असतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मुला-मुलींच्या मैत्रीमध्ये कसा फरक आहे आणि कोणाचे नाते सर्वात मजबूत आहे.

मुलींची मैत्री मुलांच्या मैत्रीपेक्षा वेगळी कशी असते?

भावना

मुली मुलांपेक्षा जास्त भावनिक असतात. महिला त्यांच्या मित्रांसोबत भावनिक बंध शेअर करतात. त्यामुळे ती तिच्या मित्रांसोबत वैयक्तिक विचार, भावना आणि अनुभव अधिक मोकळेपणाने शेअर करतात. मुली त्यांच्या मैत्रिणींशी वारंवार बोलत राहतात.

मुलांची मैत्री - मुलांच्या मैत्रीतही हे दिसत असले तरी ते भावनिकदृष्ट्या फारसे जोडलेले नसतात. मुलेही त्यांचे वैयक्तिक अनुभव मित्रांसोबत शेअर करतात पण ते तितकेसे व्यक्त होत नाहीत. मुले नेहमी त्यांच्या मित्रांना साथ देतात.

बोलण्याची आणि गप्पा मारण्याची पद्धत

मुली आणि मुले देखील त्यांच्या मित्रांशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधतात. मुली कोणत्याही विषयावर त्यांच्या मैत्रिणींशी अधिक तपशीलवार चर्चा करतात. मुली आपल्या मैत्रिणींशी बोलतांना अनेकदा दीर्घवेळेपर्यंत बोलत राहते. यात त्या त्यांच्या वैयक्तिक समस्या, नातेसंबंधातील समस्या आणि भावनिक विषयांवर बोलत असतात.

मुलं -

तर मुलांचे मित्रांसोबतचे संभाषण बहुतेक काम किंवा सामान्य विषयांवर असते. त्यांना जास्त वेळ कोणाशीही बोलणे आवडत नाही. तसेच मुला-मुलींच्या संवादाच्या पद्धतीतील फरकामुळे अनेक वेळा गैरसमज निर्माण होतात. मुल बोलतांना थेट चर्चेला सुरुवात करतात.

सामाजिक कार्य

मुलींच्या मैत्रीमध्ये त्यांचे बोलणे सहसा भावनिक संबंध जोपासणारी असतात. उदा. कॉफी पिणे, खरेदी करणे किंवा सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे. तर मुलांची मैत्री सहसा सामायिक कार्य किंवा आवडींवर केंद्रित असते. यामध्ये खेळणे, गेम पाहणे, एखाद्या प्रकल्पावर काम करणे किंवा एखादा छंद जोपासणे यांचा समावेश असतो. त्यामुळे मुलांची मैत्री आणखी घट्ट होत असते.

वाद कशावरुन होतात

या मुद्द्यावरही मुला-मुलींच्या मैत्रीत फरक आहे. मुली कोणत्याही मुद्द्यावरील मतभेदांबद्दल उघडपणे बोलण्यास तयार असतात. तिचे मत मांडून, त्या त्यांच्या मैत्रिणीच्या कोणत्याही मुद्द्यावर त्याचेकाय मत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातून त्या मैत्रीतील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करतात.

मुलं -

तर मुलं कोणत्याही विषयावरील मतभेद सोडवण्यासाठी थेट आपल्या मित्राशी बोलतात. नात्यातील मतभेद कमी करण्यासाठी ते विनोदाचा वापर करतात. बहुतेकवेळा मुलं मुख्य मुद्द्याला न छेडता दुसऱ्या विषयावर बोलण सुरू करून संबंधित मुद्द्यावरील मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा प्रकारे अनेक वेळा काही मुद्द्यांवर मतभेद राहतात.

पाठिंबा

भावनिक, सामाजिक आणि व्यावहारिक मदतीसाठी मुली अनेकदा त्यांच्या मैत्रिणीवर अवलंबून असतात. स्त्री मैत्रिणींना विश्वासपात्र म्हणून पाहत असतता. ज्या सल्ला देतात, सहानुभूती देतात आणि त्यांचं ऐकतात.

तर मुले त्यांच्या मित्रांना मदत करण्यासाठी एकत्र येतात. मुले आपल्या मित्रांना काय मदत केली त्याची जाण करून देत नाहीत. मदत केली म्हणून ते उपकार केल्याचा आव आणत नाहीत. मित्र कोणत्याही संकटात असल्यास त्याला मदत केल्यानंतर त्याला त्याची जाण करून देत नाही. मित्रासाठी काहीही करण्यास ते तयार असतात, त्यामुळे मुलांची मैत्री खूप दिवस टिकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulab Jam Recipe: तोंडात घालताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा?

Shocking : धक्कादायक! ४५ वर्षांच्या व्यक्तीने केलं ६ वर्षीय मुलीशी लग्न, कुठे घडली घटना?

Relationship vs Friendship : रिलेशनशिप की फ्रेंडशिप कशात असतो जास्त फायदा?

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

SCROLL FOR NEXT