Chanakya Niti : हवं तर शत्रूला मिठी मारा; पण अशा स्वभावाच्या व्यक्तींशी मैत्री नको

Relationship Tips : आपल्या आयुष्यतील अनेक गोष्टी आपण मित्रांसह शेअर करतो. मित्रांवर आपल्याला आपल्याहूनही जास्त विश्वास असतो. मात्र मैत्री करताना सुद्धा आचार्य चाणक्य यांनी काही नियम दिले आहेत.
Relationship Tips
Chanakya NitiSaam TV
Published On

जन्म होताच आपल्याला अनेक नातेवाईक आणि नाती मिळतात. मात्र मैत्रीचं नातं फार वेगळं असतं. कारण हे नातं आपण स्वत: निवडतो. जन्मता हे नातं आपल्याला मिळालेलं नसतं. त्यामुळे मैत्रीसाठी योग्य व्यक्तीची निवडण करणे महत्वाचे आहे. आपल्या आयुष्यतील अनेक गोष्टी आपण मित्रांसह शेअर करतो. मित्रांवर आपल्याला आपल्याहूनही जास्त विश्वास असतो. मात्र मैत्री करताना सुद्धा आचार्य चाणक्य यांनी काही नियम दिले आहेत.

Relationship Tips
Relationship Tips : पतीच्या या चुकांमुळे पत्नीचा होतो संताप; आजच सुधारा, नंतर होईल पश्चाताप

आपल्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती येतात ज्यांच्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो किंवा आपलं नुकसान होतं. आयुष्यात येणाऱ्या या संकटांपासून दूर राहण्यासाठी आपण योग्य मित्रांची निवड केली पाहिजे. आचार्य चाणक्य मित्रांबद्दल सांगताना म्हणतात की, तुम्ही एक वेळ शत्रूशी हात मिळवा मात्र ठरावीक स्वभावाच्या व्यक्तींपासून १० हात लांब राहा.

घमंडी

आचार्य चाणक्य सांगतात की, कधीही चुकूनसुद्धा घमंडी व्यक्तीशी मैत्री करू नये. ज्या व्यक्ती स्वत:ला सर्वात मोठं आणि इतरांना मूर्ख समजतो, तो व्यक्ती आपल्या कोणत्याही कामाचा नसतो. अशा व्यक्ती स्वत:चं कौतुक व्हावं यासाठी तुम्हाला संकटात टाकू शकतात, किंवा तुमची बदनामी सुद्धा करू शकतात. ज्या व्यक्तींमध्ये पैसा, संपत्ती आणि ज्ञान याबाबत मनात घमंडी नसेल अशाच व्यक्तींशी मैत्री करा.

लोभी

असं म्हणतात की लोभी व्यक्ती कधीच कुणाचंही भलं करू शकत नाही. अशा व्यक्ती फक्त स्वत:चा फायदा पाहून समोरील व्यक्तीशी मैत्री करतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून लांब रहा आणि त्यांच्याशी मैत्री करू नका, असे चाणक्य यांनी सांगितले आहे. लोभी व्यक्ती संकट समयी लालसेपोटी तुमच्या शत्रूची मदत करून तुम्हाला अडचणीत आणू शकतो.

मूर्ख व्यक्ती

काही व्यक्ती अतिशय मूर्ख स्वभावाच्या असतात. चाणक्य म्हणतात की, जो व्यक्ती स्वत:च्या बुद्धीचा विकास करू शकत नाही, बुद्धीला चालना देऊन निर्णय घेऊ शकत नाही. अशा व्यक्ती फर मूर्ख स्वभावाच्या असतात. असे मित्र आपल्या आयुष्यात असल्याने परिस्थिती चांगली असताना सुद्धा संकट ओढावण्याची शक्यता असते.

कपटी व्यक्ती

मैत्री करताना कायम समोरच्या व्यक्ती बद्दल माहिती घ्या. काही व्यक्ती आपल्यासमोर आपले कौतुक करतात आणि तुमच्या आयुष्यात चांगले क्षण येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे भासवतात. मात्र प्रत्यक्षात अशा व्यक्ती तुम्हाला संकटात टाकण्याचा प्रयत्न करत असतात. तुमच्यासाठी संकटांचा खड्डा आखतात आणि तुम्ही त्यात पडल्यावर तुम्हाला मदद करून उपकाराचे ओझे तयार करतात. अशा व्यक्ती देखील आपल्यासाठी घातक असतात.

Relationship Tips
Relationship : चेहऱ्यावरूनच ओळखा स्त्रियांचा स्वभाव; प्रेमात पडण्याआधी १० वेळा विचार कराल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com