Chanakya Neeti
Chanakya NeetiSaam Tv

Chanakya Neeti: आयुष्यात प्रगती हवी तर फॉलो करा आचार्य चाणक्य यांचे ५ टीप्स; दूर होतील अडचणी

Chanakya Neeti: आज आपण चाणक्य यांच्या ५ गोष्टी जाणून घेणार आहोत, जे आपल्याला प्रगती करण्यास मदत करतील. आयुष्यात प्रगती साधायची असेल तर आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात काही लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
Published on

Chanakya Neeti For Success :

आयुष्यात यश मिळवण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. जे लोक हे नियम पाळतात ते लोक यश संपादन करत असतात. चाणक्य यांचे उपदेश पाळला तर त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होत असतात. आज आपण चाणक्य यांच्या ५ गोष्टी जाणून घेणार आहोत, जे आपल्याला प्रगती करण्यास मदत करतील. आयुष्यात प्रगती साधायची असेल तर आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात काही लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. (Latest News)

मुर्खांशी कधीही वाद घालू नका

मुर्खांना कधीच समजवण्याचा आणि पटवण्याचा प्रयत्न करू नये, असं आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये म्हटलंय. मूर्ख माणसे त्यांना वाटेल तेच करतात. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. यामुळे त्यांच्याशी वाद घालण्यात किंवा त्यांना समजवण्यात कोणातच अर्थ नसतो. मूर्खांना समजवण्यात आपला वेळ फुकट घालवू नका.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपला वीक पाईंट कोणाला सांगू नका

जगाला आपल्यातील मजबूत आणि कोणते चांगले कौशल्य आहे ते सांगावे. आपल्यातील दोष, वाईट गोष्टी कोणालाच सांगू नका, असं चाणक्यांनी आपल्या नितीशास्त्रात म्हटलंय. जर तुम्ही तुमच्यातील दोष किंवा तुम्हाला काही येत नसल्याचं समोरील व्यक्तीला सांगितलं तर तो त्याचा फायदा घेईल. तो व्यक्ती वेळोवेळी ती गोष्टी इतर लोकांसमोर सांगत राहील आणि तुम्हाला ना उमेद करत राहील. त्यामुळे व्यक्तीने नेहमी आपल्यातील चांगल्या गोष्टी सांगाव्यात.

विचारपूर्वक पैसा खर्च करा

प्रत्येक व्यक्तीला हे माहित असावं त्याने आपला पैसा कधी, कुठे आणि किती खर्च करावा. कारण विचार न करता पैसे खर्च केले तर भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे पैसे खर्च करण्यापेक्षा वाचवण्याचा विचार करा.

तुमचा विश्वास न करणाऱ्यांपासून दूर रहा

जे लोक तुमचे पूर्ण ऐकत नाहीत अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका. हे लोक फक्त स्वत:बद्दल बोलत राहतात आणि इतरांना त्यांच्यासमोर हीन समजतात. यावर कधीही विश्वास ठेवू नका, असं आचार्य चाणक्यांनी आपल्या निती शास्त्रात म्हटलंय.

जास्त स्नेह करू नका

व्यक्तीने कोणाशी स्नेह जास्त करू नये. बहुतेकदा स्नेह एखाद्या व्यक्तीचा नाशदेखील करू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याशी जोडली जाते, तेव्हा तो त्या व्यक्तीशिवाय जगू शकत नाही. ज्यामुळे ते त्याच्या आरोग्याकडे नातेसंबंधांकडे आणि ध्येयांकडे लक्ष देत नसतो असं चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात म्हटलंय.

Chanakya Neeti
Chanakya Niti On Bad Habits : या 4 सवयींमुळे मेहनत करूनही तुम्ही करिअरमध्ये ठरता अपयशी, जाणून घ्या चाणक्य निती काय म्हणते...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com