Dementia, Memory loss diseases, memory loss causes ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Memory Loss: स्मृतिभ्रंश म्हणजे काय ? वयानुसार त्याचा आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो का ?

आपल्या वाढत्या वयानुसार आपल्या काही गोष्टी सहज आठवत नाही.

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या वाढत्या वयानुसार आपल्या काही गोष्टी सहज आठवत नाही. एखादी वस्तू कोणत्या जागी ठेवली आहे हे माहित असून सुध्दा आपल्या आठवत नसते.(Memory loss diseases)

हे देखील पहा -

स्मृतिभ्रंश हा एक असा आजार आहे ज्याचा परिणाम आपल्याला आठवणींवर होतो. हा वेगळा आजार नसून अनेक वेगवेगळ्या आजारांना एकत्रितपणे करून स्मृतिभ्रंश म्हटले जाऊ शकते. स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. यामुळे त्याचे नेमके कारण काय हे आपल्याला कळत नाही. हा आजार अधिकतर वयोवृध्दांमध्ये आढळून येतो. जाणून घेऊया स्मृतिभ्रंश या आजारांबद्दल.

स्मृतिभ्रंश म्हणजे काय ?

स्मृतिभ्रंश म्हणजे फक्त स्मृती किंवा आठवणी विसरणे नाही. यामध्ये आठवणी शिवाय आपली विचार करण्याची शक्ती, निर्णय क्षमता, नियंत्रण इत्यादी वेगवेगळ्या क्षमतांवर परिणाम होऊ शकतो. यात आपल्या मेंदूवर अधिक परिणाम होतो. यांची लक्षणे आपल्याला हळूहळू दिसू लागतात. यांचे स्ट्रोक ही आपल्याला येऊ शकतात.

लक्षणे -

१. आपली स्मरणशक्ती कमी होत जाणे किंवा आपण गोष्टी विसरत असताना इतर दुसऱ्या व्यक्तीकडून ही गोष्ट आपल्याला कळणे.

२. कोणताही शब्द शोधण्यात किंवा बोलण्यात त्रास होणे.

३. बाहेर कुठेही गेल्यानंतर रस्ता विसरणे किंवा आपण कुठे जात आहोत हे लक्षात न राहाणे.

४. आपल्याला सतत अस्वस्थता जाणवणे किंवा शरीरात (Health) मानसिकबद्दल होत जाणे.

५. मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते. आपण जे काही करत आहोत किंवा बोलताना अचानक गोष्टी विसरु लागणे.

६. हा आजार (Disease) वयोमानानुसार होत असतो. याची लक्षणे वेळीच कळाली तर त्यावर उपचारही करता येतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार...

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT