National Doctors Day 2022 : जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

राष्ट्रीय डॉक्टर दिवस का साजरा केला जातो ?
National Doctors Day 2022, History, Theme & Importance
National Doctors Day 2022, History, Theme & Importanceब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आपल्या रोजच्या जीवनात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी आपल्याला अनेक सल्ले डॉक्टरांकडून मिळतात. आपण आजारी पडल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टरांकडे जातो.(National Doctors Day 2022)

हे देखील पहा -

कोरोनासारख्या महामारीच्या वेळी डॉक्टरांनी आपल्या स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निभावले. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो.

इतिहास -

बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ १ जुलै १९९१ साली भारतात प्रथमच 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा करण्यात आला. रॉय यांची जयंती व पुण्यतिथी ही एकाच दिवशी येते. रॉय यांनी मानवतेच्या कल्याणासाठी मोठेयोगदान दिले आहे. ते एक उत्तम डॉक्टरांसोबत शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते देखील होते. रॉय हे पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध चिकित्सक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. १९४८ ते १६६२ या त्याच्या शेवटच्यापर्यंत त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री राहून देशाची सेवा केली.(National Doctors Day History)

National Doctors Day 2022, History, Theme & Importance
Travelling Tips : फिरायला जाताना मळमळ किंवा डोकेदुखीचा त्रास जडला तर काय कराल?

महत्त्व -

डॉक्टर हे फक्त रुग्णांना तपासत नाही तर ते त्यांना बरे करण्याचे कार्य देखील करतात. देशातील येणाऱ्या भावी पिढ्यांना ते शिक्षित करुन त्यांना तयार करतात. तसेच या दिवशी कार्यक्रम ठेवून डॉक्टरांचे आपल्या आयुष्यातील स्थानाबद्दल जागरुकता निर्माण केली जाते. त्यांचा सन्मानही केला जातो. या दिवशी, रुग्ण त्यांच्या डॉक्टरांचे (Doctor) कौतुक करतात, मोफत तपासणी शिबिरे आयोजित केली जातात.(Importance of National Doctors Day)

थीम -

यंदा भारतात (India) राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाची “फॅमिली डॉक्टर्स ऑन द फ्रंट लाइन'' ही थीम आहे. संपूर्ण कुटुंबाची किंवा समाजाची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांच्या योगदानावर भर टाकते.(National Doctors Day 2022 Theme)

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com