World COPD Day
World COPD Day  Saam Tv
लाईफस्टाईल

World COPD Day : क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी म्हणजे काय ? हा आजार कसा होतो ? याचा हृदयाशी संबंध येतो का ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

World COPD Day : जागतिक क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डे दरवर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या बुधवारी साजरा केला जातो. यावर्षी हा विशेष दिवस 16 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्यामागे COPD बद्दल जनजागृती करण्यापासून लोकांना त्याच्या उपचारांशी संबंधित माहिती देणे हा आहे. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज म्हणजे COPD, त्याची लक्षणे (Symptoms) आणि उपचार (Remedies) काय आहे ते जाणून घेऊया

COPD म्हणजे काय?

ओपीडीला इंग्रजीमध्ये क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज असेम्हणतात. हा एक फुफ्फुसाचा आजार आहे, ज्यामध्ये एम्फिसीमा आणि ब्राँकायटिस सारख्या परिस्थितींमध्ये फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होतो. एम्फिसीमा फुफ्फुसांना संक्रमित करते ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते आणि ब्राँकायटिसमुळे ब्रोन्कियल ट्यूब जळजळ आणि अरुंद होतात.

COPD ची मुख्य कारणे -

जे लोक धूम्रपान करतात किंवा तंबाखूचे सेवन करतात त्यांना सीओपीडीचा सर्वाधिक धोका असतो. याशिवाय अस्थमाच्या रुग्णांमध्येही सीओपीडीचा धोका दिसून येतो. हे त्यांच्या शरीरात अल्फा-१- अँटीट्रिप्सिन नावाच्या प्रथिनाच्या कमतरतेमुळे होते. सीओपीडीचे तिसरे मुख्य कारण म्हणजे प्रदूषण, धुराचा जास्त संपर्क किंवा अगदी रासायनिक कारखान्यात काम करणे हे असू शकते.

COPD ची लक्षणे-

- खोकला, घशात श्लेष्मा अडकणे, छातीत घट्टपणा जाणवणे आणि घरघर येणे.

- सौम्य शारीरिक हालचालींनंतरही श्वास घेण्यात अडचण.

- सर्व वेळ थकवा जाणवणे

- पाय आणि बोटे सुजणे

- जलद वजन कमी होणे

COPD पासून प्रतिबंध -

COPD साठी सध्या कोणतीही चाचणी किंवा तपासणी उपलब्ध नाही. लक्षणे पाहूनच याचा अंदाज लावता येतो, त्यामुळे COPD ची लक्षणे जाणवताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. याशिवाय, दीर्घकाळ चालणारा खोकला आणि श्वास घेण्यात अडचण याकडे दुर्लक्ष करू नका, ही सीओपीडीची लक्षणे असू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज; दरेकरांचं काय?

Today's Marathi News Live : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

Camphor Benefits: देवाला प्रसन्न करण्यासह आरोग्यासाठी कापूर आहे फायदेशीर

Sonakshi Sinha : अंधारात दिवा जसा, तसं तुझं सौंदर्य...

SCROLL FOR NEXT