Chandipura Virus Symptoms and Prevention Saam TV
लाईफस्टाईल

Chandipura Virus Symptoms: लहान मुलांसाठी धोकादायक असलेला चांदीपुरा व्हायरस आहे तरी काय? वाचा लक्षणे आणि उपाय

Chandipura Virus meaning and prevention ways: हा आजार नेमका काय आहे? त्याची लक्षणे काय आहेत? तसेच यावर कसा उपाय करावा? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

कोरोना विषाणूने नागरिकांना हैराण केल्यानंतर आता देशात नव्या चांदीपुरा व्हायरसचा शिरकाव झाला आहे. चांदीपुरा व्हायरसमुळे लहान मुलांच्या जीवाला सर्वाधिक धोका आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे गुजरातमधील 6 मुलांचा मृत्यू झालाय. या विषाणूमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

लहान मुलांना या विषाणूची झपाट्याने लागण होत आहे आणि यात मुलांचा मृत्यू होत आहे, हे पाहून आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. आता हा आजार नेमका काय आहे? त्याची लक्षणे काय आहेत? तसेच यावर कसा उपाय करावा? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

डॉ. सुनीत के सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, चांदीपुरा विषाणू फार जास्तप्रमाणात घातक आहे. त्याचा परिणाम थेट व्यक्तीच्या मेंदूवर होतो. या विषाणूची लागण होताच व्यक्ती कोमात जातो. मेंदूवर इतका जास्त प्रभाव पडतो की, व्यक्तीचा यात मृत्यू देखील होतो.

चांदीपुरा व्हायरसची लक्षणे काय आहेत?

  • ताप येणे

  • उलट्या

  • पोटदुखी

  • चक्कर येणे अशी लक्षणे आहेत.

या विषाणूचे नाव चांदीपुरा का आहे?

या विषाणूचा पहिला प्रादुर्भाव 1964-65 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथील चांदीपुरा गावात झाला होता. अन्य कोणत्याही ठिकाणी हा विषाणू आढळला नाही. त्यामुळे त्याला चांदीपुरा व्हायरस असे नाव देण्यात आले.

चांदीपुरापासून संरक्षण कसे करावे?

  • चांदीपुरा व्हायरसपासून संरक्षणासाठी परिसर स्वच्छ ठेवा.

  • कुठेही पाणी साचू देऊ नका.

  • तुम्हाला डास आणि कीटक चावणार नाहीत याची काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT