How to Prevent Migraine, Headache ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मायग्रेन म्हणजे काय ? युवा पिढीत याचा त्रास का वाढतो आहे ?

मायग्रेन हा सतत डोकेदुखीचा त्रास वाढवणारा गंभीर आजार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जगभरात मायग्रेनचा त्रास सध्या वाढताना दिसत आहे. यामध्ये सतत डोकेदुखी, मळमळणे, उलटी येणे व चक्कर सारखी समस्या उद्भवू लागते.

हे देखील पहा -

मायग्रेन हा सतत डोकेदुखीचा त्रास वाढवणारा गंभीर आजार आहे. कधी डोक्याच्या एका बाजूला दुखणे किंवा दोन्ही बाजूंना जाणवतो. मायग्रेनचा झटका आल्यानंतर अंधारी येणे, मळमळणे, प्रकाश सहन न होणे, चेहऱ्याला झिणझिण्या आल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसून येतात. तसेच मायग्रेनचा झटका आल्यानंतर शरीराचा अर्धा भाग कधी कधी काम करत नाही. अशावेळी आपण त्वरीत डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा.

मायग्रेनच्या त्रासाचे कारण काय ?

मायग्रेनची समस्या ही युवा पिढीमध्ये अधिक प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. १८ ते ३० वयांचा तरुणांनी यासाठी विशेष काळजी घ्यावी. यांचे प्रमुख कारण आपली बदलेली जीवनशैली, अपुरी झोप, काम करण्याच्या वेळा व खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे मायग्रेनचा त्रास जाणवू लागतो. सध्या कोरोनाच्या (Corona) काळात याचे वाढलेले प्रमाण दिसून आले आहे.

उपाय -

मायग्रेनला आपण वेळीच रोखू शकतो हा आजार बदलेल्या जीवनशैलीमुळे होतो. यासाठी आपण आपल्या बदलेल्या जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. झोपण्याच्या व उठण्याच्या सवयीत बदल करा. आपल्या शरीरातील ग्लूकोज वाढवण्यासाठी दर २ ते ३ तासांनी खायला हवी. अधिक वेळ उपाशी राहू नका त्यामुळे त्रास वाढू शकतो. मायग्रेनच्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी योग किंवा मेडिटेशनचा वापर आपण करु शकतो.

उपचार -

मायग्रेनवर आपण औषधोपचारांनी आराम मिळवू शकतो. परंतु, प्रत्येक रुग्णांची स्थिती ही वेगळी असते त्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारे ट्रीट करावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT