शरीरात जीवनसत्त्वे अधिक झाल्यास ते ओळखायचे कसे जाणून घ्या

आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता झाल्यास आपण अनेक आजारांनी ग्रस्त होऊ लागतो.
Side Effects of Vitamins Overdose, Health issue
Side Effects of Vitamins Overdose, Health issueब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता झाल्यास आपण अनेक आजारांनी ग्रस्त होऊ लागतो. त्यासाठी डॉक्टर आपल्याला काही औषधे व खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला सांगतात.

हे देखील पहा-

अनेक प्रकारची खनिजे व जीवनसत्त्वांचा (Vitamins) आहारात समावेश केल्याने आरोग्य (Health) सुदृढ राखण्यास व अनेक रोगांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरते. शरीरासाठी जीवनसत्त्वे ब, ब-१२, क, ड, ई हे अधिक महत्त्वाचे आहे. याचा आहारात करायला हवा. जीवनसत्त्व ब-१२ या पदार्थांचे अधिक सेवन करावे. आपल्या अनेक सीफूड व औषधांमधून जीवनसत्त्व ब-१२ मिळू शकते. यामुळे शरीरातील लाल रक्तपेशी निर्माण होण्यास मदत होते. परंतु जीवनसत्त्वांचे जितके शरीराला फायदे होतात तितकेच त्याचे अधिक सेवन केल्याने नुकसान होते. यांचा आपल्या शरीराला कसे नुकसान होते हे जाणून घेऊया.

जीवनसत्त्व ब-१२ चे अधिक सेवन केल्याने नुकसान कसे होते-

जीवनसत्त्व ब-१२ ची कमतरता शरीरात जाणवायला लागल्यास आपण अनेक औषधांचे सेवन करतो. तसेच जीवनसत्त्व ब-१२ कोणत्या पदार्थात अधिक आहे याची माहिती नसल्यामुळे आपण औषधांचा पर्याय निवडतो. यामुळे आपल्याला शरीराला अधिक नुकसान होते. औषधांचा वापर करण्यापेक्षा आपण अन्नपदार्थाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास ही कमतरता कमी होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Side Effects of Vitamins Overdose, Health issue
Mental Stress : मानसिक तणावापासून आपल्या नात्याला दूर कसे ठेवाल ?

जीवनसत्त्व ब-१२ चे अधिक सेवन केल्यास दिसणारी लक्षणे -

आहारात जीवनसत्त्व ब-१२ चा समावेश केल्याने आपल्याला नुकसान कमी होऊ शकते. यांचे इंजेक्शन घेतल्याने आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसू लागते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण औषधे किंवा कोणतेही इंजेक्शन घेऊ नये. अन्यथा त्याचे वाईट परिणामांना आपल्याला सहन करावे लागतील. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास डोकेदुखी, चक्कर येणे, अतिसार, उलट्या, थकवा, मुरुमे किंवा शरीर थरथरू लागते. तसेच यांची जीवनसत्त्व ब-१२ ची कमतरता जाणवू लागल्यास आपल्याला थकवा वाढतो, चिडचिडेपण, त्वचा पिवळी पडणे, डोळ्यांचा त्रास व गोष्टी अचानक विसरु लागतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com