Earth Rotation Saam TV
लाईफस्टाईल

पृथ्वीने एक मिनीटासाठी फिरणे थांबवले तर काय होईल?

पृथ्वीच्या परिभ्रमणाबद्दल बोलायचे झाले तर ही प्रक्रिया सतत चालू राहते आणि पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते.

वृत्तसंस्था

पृथ्वी आपल्या अक्षावर (Earth Rotation) फिरते, त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. पृथ्वी एका वर्षात सूर्याभोवती फिरते आणि त्यामुळे ऋतू बदलतात. बरं, तुम्हाला हे माहित असेलच, पण समजा पृथ्वी काही सेकंदासाठी फिरायची थांबली तर काय होईल. जर पृथ्वी एक सेकंदासाठी फिरायची थांबली (Earth Stop Rotation) तर पृथ्वीवर काय परिणाम होईल की? ती नेहमीप्रमाणेच चालू राहील. तर आज आम्ही तुम्हाला संशोधनाच्या आधारावर सांगण्याचा प्रयत्न करु की एक मिनीटासाठी पृश्वी फिरायची थांबली तर काय होईल.

पृथ्वी फिरणे थांबले तर काय होईल?

पृथ्वीच्या परिभ्रमणाबद्दल बोलायचे झाले तर ही प्रक्रिया सतत चालू राहते आणि पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते. पृथ्वी 24 तासांत आपली एक परिक्रमा पूर्ण करते आणि पृथ्वीच्या फिरण्याचा वेग ताशी 1000 मैल मानला जातो. होय, ही बाब निश्चितच आहे की हा वेग मानवाला कळेलच असे नाही, कारण यासोबतच आपणही पुढे जात असतो. याला थांबवण्याबाबत अनेक संशोधने झाली आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत.

अहवालानुसार, जर पृथ्वीने अचानक फिरणे थांबवले तर आपल्या ग्रहाचा बहुतांश भाग नष्ट होईल. असे काय होईल की अर्ध्या ग्रहाला सतत सूर्याच्या उष्णतेचा सामना करावा लागेल आणि अर्ध्या ग्रहाला अवकाशातील थंडीचा सामना करावा लागेल. त्यामुळे अर्ध्या भागावर एवढी उष्णता आणि एवढी थंडी पडेल की अनेक प्राण्यांना त्याचा फटका बसेल आणि त्याचे परिणाम फार वाईट होतील. त्याचप्रमाणे बाष्पीभवन सारख्या प्रक्रिया होतील.

शास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन यांच्या मुलाखतीच्या आधारे डीएनएच्या अहवालात असे म्हटले आहे की, असे झाल्यास अशा भीषण घटनेत सर्वांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. टायसन म्हणाले, 'ते विनाशकारी असेल'. आपण सर्व पृथ्वीसह पूर्वेकडे 800 mph वेगाने जात असतो. त्याच वेळी जर पृथ्वीने फिरणे थांवबले, हे सर्व जागेवर थांबेल आणि याचे आपल्याला भयानक दृश्य पहायला मिळेल. असे मानले जाते की या स्थितीत पृथ्वीवरील प्रत्येकजण नष्ट होईल. हा एक पृथ्वीवरील वाईट दिवस असेल असे मानले जाते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT